Lakhat Ek Amcha Dada : दैनंदिन मालिकांचं शूटिंग जवळपास १२ ते १३ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. यादरम्यान या सगळ्या कलाकारांमध्ये सेटवर एक सुंदर असं बॉण्डिंग तयार होतं. हे कलाकार ऑनस्क्रीन आपलं मनोरंजन करतातच पण, यांच्यात ऑफस्क्रीन सुद्धा तेवढंच घट्ट नातं तयार होतं. सेटवर पार्टी करणं, धमाल, मजा-मस्ती, डान्स व्हिडीओ बनवणं या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळात प्रत्येक मालिकांच्या सेटवर पाहायला मिळतात. अर्थातच या सगळ्या गोष्टी प्रेक्षक सुद्धा आवडीने पाहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) या मालिकेत दमदार स्टारकास्ट पाहायला मिळते. अभिनेता नितीश चव्हाण सूर्या दादाची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. याचं संपूर्ण विश्व त्याच्या चार बहि‍णी आणि तुळजाभोवती फिरतं. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी मालिकेत सूर्या दादाच्या बहिणींच्या भूमिका साकारत आहेत. तर, तुळजाची भूमिका अभिनेत्री दिशा परदेशी साकारत आहे. या मालिकेतील कलाकारांचे सेटवर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा आणखी व्हिडीओ चर्चेत आला आहे.

हेही वाचा : मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स

‘बिग बॉस मराठी’ विजेत्या सूरज चव्हाणमुळे ‘झापुक झुपूक’ हे गाणं महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झालं आहे. सूरज ‘बिग बॉस’च्या घरात नेहमीच या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाला होता. त्याच्या या गाण्याची भुरळ आता सर्वांनाच पडली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील कलाकारांनी याच गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

‘झापुक झुपूक’ असं कॅप्शन देत अभिनेता नितीश चव्हाणने म्हणजेच मालिकेतील सूर्या दादाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये नितीशसह इशा संजय, महेश जाधव, जुई तनपुरे, स्वप्नील कणासे हे सगळे कलाकार ‘झापुक झुपूक’ गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Lakhat Ek Amcha Dada : अखेर डॅडींचा प्लॅन यशस्वी होणार; तेजूचा होणार नवरा लग्नातून गायब होणार, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) या मालिकेतील कलाकारांनी केलेल्या ‘झापुक झुपूक’ डान्स व्हिडीओला अवघ्या काही तासांतच लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत या संपूर्ण टीमचं प्रोत्साहन वाढवलं आहे. हा डान्स व्हिडीओ तेजुच्या ऑनस्क्रीन लग्नाच्या सीक्वेन्समध्ये शूट केल्याचं सर्वांचा लूक पाहून स्पष्ट होत आहे. आता मालिकेत तेजुचं लग्न नेमकं कोणाशी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek amcha dada marathi serial starcast dances on zapuk zupuk song sva 00