सध्या टीआरपीसाठी वाहिन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. प्रत्येक मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जुन्या मालिका बंद करून वाहिन्या नव्या मालिकांची घोषणा करत आहेत. अजूनही नव्या मालिका येण्याच सत्र सुरुच आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘नवरी मिळे हिटलरला’ व ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेनंतर आणखी एक नवी मालिका येणार आहे. या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आला आहे.
अभिनेता राकेश बापट व वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि अभिनेता अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या दोन्ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या दोन्ही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं. त्यामुळे आता ‘झी मराठी’ नवीन मालिका घेऊन येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘लाखात एक आमचा दादा’
‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये चार बहिणी आणि एक भाऊ पाठमोरे पाहायला मिळत आहेत. आईची माया लावणारा ‘लाखात एक आमचा दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या मालिकेत कोणते कलाकार झळकणार? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. पण हा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये या नव्या मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Video: अभिनेता जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
हेही वाचा – “होय, मी कपिल शर्मा शोची कॉपी केली…”, निलेश साबळेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “इंडस्ट्रीचा फायदा…”
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकांपूर्वी ‘झी मराठी’वर ‘पारू’ व ‘शिवा’ मालिका सुरू झाल्या. १२ फेब्रुवारीपासून या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. यावेळी ‘झी मराठी’ने ‘जगद्धात्री’ या नव्या मालिकेची घोषणा केली होती. ‘झी बांगला’वरील ब्लॉकबस्टर मालिका ‘जगद्धात्री’ या मालिकेचा हा रिमेक आहे. पण अजूनपर्यंत ‘जगद्धात्री’ या नव्या मालिकेविषयी कोणतीही नवी अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांचं या नव्या मालिकेकडे देखील लक्ष लागून राहिलं आहे.