Lakhat Ek Amcha Dada : ‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. कमी कालावधीत या नवीन मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका. अभिनेत्री श्वेता शिंदेची निर्मिती असलेली ही नवी मालिका ८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अवघ्या महिन्याभरात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच टीआरपी देखील चांगला मिळताना दिसत आहे. अशातच ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा एक डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) मालिकेतील सूर्यकांत जगताप उर्फ सूर्यादादाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता नितीश चव्हाणने हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “फूल हाउस”, असं कॅप्शन देत त्यानं हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, नितीशसह मालिकेतील त्याच्या चार बहिणी आणि मित्र काजू भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: काळ्या रंगाच्या स्कर्ट-टॉपमध्ये ‘पारू’ फेम शरयू सोनावणेचा क्यूट अंदाज, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बार्बी डॉल”

सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेलं आगरी गाणं ‘वाटाण्याचा गोल दाना’ यावर नितीश इतर कलाकारांबरोबर डान्स करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओतील नितीश व काजू म्हणजेच महेश जाधवच्या नादखुळा डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओच्या शेवटची नितीश महेशला उचलून जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

नितीश चव्हाणने शेअर केलेल्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. “काय अज्या तोड नाही राव तुला”, “टॅलेंट”, “एक नंबर डान्स टॅलेंट”, “सुपर”, “क्या बात है”, “मस्त”, “फुल्ल राडा”, “एक नंबर”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे महेश जाधवच्या डान्सचं कौतुक करण्यात आलं आहे.

हेही वाचा – Video: सुशांत सिंह राजपूतनंतर रिया चक्रवर्ती करोडपती निखिल कामथला करतेय डेट, बाईकवरचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले…

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) मालिकेतील सूर्यादादाच्या चार बहिणींची नावं तेजश्री, राजश्री, भाग्यश्री आणि धनश्री अशी आहेत. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी बहिणींच्या भूमिकेत झळकल्या आहेत. मालिकेतील सूर्यादादा व त्याच्या बहिणीमधील गोड नातं प्रेक्षकांना चांगलं भावलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek amcha dada nitish chavan dance with co artist on vatanyacha gol dana song pps