‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सध्या वेगळं वळण आलेलं पाहायला मिळतं; तर काही दिवसांपूर्वीच मालिकेत सूर्याची बहीण धनूचं लग्न झालेलं पाहायला मिळालं. सूर्या त्याच्या प्रत्येक बहिणीला चांगला जोडीदार मिळावा आणि त्यांनी सुखी संसार करावा यासाठी प्रयत्न करीत असतो. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने नुकतच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडयावर पोस्ट केला आहे. पोस्ट केलेल्या प्रोमोमध्ये मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळतं.
या मालिकेचा नवीन प्रोमो ‘झी मराठी’ वाहिनीनं त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला असून. समोर आलेल्या प्रोमोला ‘देवाच्या दारात होईल का सूर्या आणि आईची भेट?’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या प्रोमोमध्ये सूर्या तुळजाला ‘तू अभिषेकाचं बघ मी प्रदक्षिणा घालून आलो’ असं म्हणतो. पुढे आशा सूर्याच्या पायाला चटके लागू नयेत म्हणून मंदिराजवळची जमीन पाण्याने ओली करताना दिसते. तर दुसरीकडे तेजू शत्रूला एका मुलीसह बोलताना बघते.
तेजू याबाबत शत्रूला जाब विचारते; पण शत्रू तिला ‘मी तर प्रसाद वाटत होतो’, असं उत्तर देत तिच्याशी खोट बोलतो. सूर्या-तुळजा व तेजू-शत्रू हे सगळे मंदिरात गेलेले असताना तिथे आशा असते आणि आशा सूर्याला बघताच तिला त्याला भेटण्याची इच्छा होते; परंतु तिला सूर्याला भेटता येत नाही. तर सध्या या मालिकेत वेगळं वळण आलं असून, आशाच सूर्याची आई असल्याचं सत्य सूर्यासमोर येईल का? आणि शत्रूचा नवा डाव तेजू ओळखणार का? सूर्याला भेटयाची आशाची इच्छा अधुरीच राहणार का? हे पाहणं रंजक ठरेल.
दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत तेजु व धनु यांचं लग्न झालं असून सूर्यादादा त्याच्या बहिणींच्या सुखासाठी अनेक प्रयत्न करीत असतो. त्याच्या बहिणींनी चांगल्या घरात लग्न करुन सुखी संसार करावा ही त्याची इच्छा असते आणि या सगळ्यामध्ये तुळजा कायम त्याच्याबरोबर असलेली पाहायला मिळते. परंतु, तुळजाचे वडील काही ना काही करून सूर्याला त्रास देण्याच्या प्रयत्नात असतात; पण तुळजा नेहमीच सूर्याला तिच्या वडिलांच्या कटकारस्थानापासून वाचवण्याचा प्रयत्न करीत असते.