Lakhat Ek Amcha Dada Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सध्या तुळजाचं लग्न नेमकं कोणाशी होणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अशातच तुळजाचं लग्न सूर्याशी होणार असल्याचं वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमधून समोर आलं आहे. आता मालिकेत पुढे जाऊन कोणते ट्विस्ट येणार, डॅडी दोघांना कोणती शिक्षा देणार? हे आगामी भागांमध्ये स्पष्ट होईल. परंतु, मालिका रंजक वळणावर असताना यामधील कलाकार ऑफस्क्रीन सुद्धा तेवढीच धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) या मालिकेतील कलाकारांनी सेटवर एकत्र येऊन मराठी लोकगीतावर जबरदस्त डान्स केला आहे. लोकगीतं हा महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राला लोकगीतं व नाट्यसंगीताचा समृद्ध इतिहास आणि अमूल्य वारसा लाभला आहे. आजही प्रत्येक समारंभात ही लोकगीतं आवर्जून गायली जातात. अशाच एका प्रसिद्ध मराठी लोकगीतावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचे कलाकार थिरकले आहेत.

हेही वाचा : Video : सूरजची कॅप्टन्सी जान्हवीला खुपली! रागात थेट विचारला जाब अन् नंतर झाली भावुक; नेटकरी म्हणाले, “४ दिवस चांगलं…”

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा डान्स

मालिकेतील ( Lakhat Ek Amcha Dada ) एकूण १० कलाकारांनी “गणबाई मोगरा गणाची साडी…” या मराठी लोकगीतावर भन्नाट डान्स केला आहे. “गणबाई मोगरा…” हे लोकगीत सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहे. या गाण्यावर हे सगळे कलाकार थिरकले आहेत. यावेळी या सगळ्यांनी पिवळ्या रंगाच्या थीमनुसार पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. अगदी नटून-थटून या कलाकारांनी जबरदस्त डान्स केला आहे.

मालिकेतील कलाकारांनी याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर करत याला “गणबाई मोगरा…” असं कॅप्शन दिलं आहे. या डान्स व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय मालिकेच्या चाहत्यांनी स्वप्नील, नितीश चव्हाण, इशा, समृद्धी, अतुल, महेश जाधव या सगळ्या कलाकारांवर या हटके डान्ससाठी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : भूषण प्रधानने घेतलं नवीन घर! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आई-बाबांना दिली खास भेट; म्हणाला, “गेल्या ६ महिन्यांपासून…”

दरम्यान, यापूर्वी ‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) या मालिकेतील कलाकारांनी यापूर्वी “वाटाण्याचा गोल दाणा…” आणि एका लोकप्रिय दाक्षिणात्य गाण्यावर भन्नाट डान्स केले होते. या व्हिडीओवर देखील नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितीश सूर्यादादाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी सूर्या दादाच्या बहिणीच्या रुपात झळकत आहेत.