Lakhat Ek Amcha Dada Serial: ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील पाच भावांडांभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. अभिनेता नितीश चव्हाण, दिशा परदेशी, गिरीश ओके, अतुल कुडले, सुमेधा दातार, कल्याणी चौधरी, कोमल मोरे, समृद्धी साळवी, ईशा संजय, जुई तनपुरे यांच्यासह मालिकेत प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नितीशने साकारलेला सूर्यादादा असो किंवा दिशाने साकारलेली तुळजा प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. सध्या प्रेमाचा सप्ताह सुरू आहे. व्हॅलेंटाइन डेला काही दिवस बाकी आहे. त्यानिमित्ताने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत प्रेममय वातावरण पाहायला मिळणार आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नुकताच नवा सुंदर प्रोमो ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सूर्या तुळजाला खास सरप्राइज देतो, जे पाहून तुळजाला सुखद धक्का बसतो. त्यानंतर दोघांमधलं प्रेम बहरत.
या प्रोमोच्या सुरुवातीला तुळजा सूर्याला शोधताना दिसत आहे. यावेळी ती सूर्या शोधत त्याच्या घरी पोहोचते. तेव्हा फुलांनी, फुग्यांची सजवलेलं आणि रोषणाई केलेलं घर पाहून तुळजाला धक्काच बसतो. ती घरात येताच तिच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण होते. हे खास सरप्राइज सूर्याने तुळजासाठी दिलं असतं. हे पाहून तुळजा म्हणते, “हे तुझं कसलं सरप्राइज आहे. इथे माझा जीव गेला असता.” त्यावर सूर्या म्हणतो, “माझ्यावर एवढा जीव आहे?” तेव्हा तुळजा म्हणते की, हो, तू माझा जीव आहेस.
त्यानंतर दोघं केक कापून हा प्रेमाचा दिवस साजरा करतात दिसत आहे. तसंच दोघं डान्स करत रोमँटिक होताना पाहायला मिळत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा हा सुंदर प्रोमो सध्या खूपच चर्चेत आला आहे.
दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत आता सूर्याच्या आईची एन्ट्री झाली आहे. तसंच दुसऱ्या बाजूला सूर्याच्या घरफोडी प्रकरणातील आरोपीला अजून सापडला नाहीये. सूर्याला पुष्पा काकीवर संशय आहे. त्यामुळे याप्रकरणाचा छडा सूर्या आणि तुळजा कसे लावतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.