Lakhat Ek Amcha Dada Upcoming Episode : भर लग्नमंडपातून तुळजा पळून गेल्यामुळे डॅडींनी तिचं लग्न सूर्याशी लावून दिलं होतं. एवढंच नव्हे तर ती आपल्यासाठी मेली असल्याचं सगळ्यांसमोर जाहीर केलं होतं. पण आता हे चित्र बदललेलं दिसत आहे. डॅडींनी चक्क तुळजा, सूर्या आणि त्याच्या चार बहिणींना घरी पाहुणचारासाठी बोलावलं आहे. पण याच पाहुणचाराच्या वेळी शत्रूने एक डाव रचला आहे; जो चांगलाच फसल्याचं समोर आलं आहे. याचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सुरुवातीला डॅडी तुळजाची माफी मागताना दिसत आहे. ते म्हणतात, “मला माफ करा.” तेव्हा तुळजा म्हणते की, तुम्ही फक्त माझ्या वस्तुंची, माझ्या आठवणींची नाहीतर माझ्या स्वप्नांचीही राख केली. यासाठी मी तुम्हाला कधी माफ करणार नाही. याच वेळी दुसऱ्याबाजूला काजू, पुड्या आणि शत्रूची एकमेकांना धडक होते. तिघं पण खाली पडतात. यावेळी काजू, पुड्या आणि शत्रू यांनी केलेला डाव फसतो.

हेही वाचा – फुलेरामध्ये पुन्हा होणार ‘पंचायत’, चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात; जाणून घ्या काय असणार कथा अन् कधी होणार प्रदर्शित

शत्रूला सूर्याच्या जेवणात जुलाबाच्या गोळ्या मिसळायच्या असतात. तर काजू, पुड्याला शत्रूच्या जेवणात भांग मिसळायची असते. पण जेव्हा धडक होते तेव्हा काजू, पुड्या आणि शत्रू यांच्या हातातील कागद्याच्या पुड्या बदलतात. शत्रूकडची जुलाबाची गोळी काजू, पुड्याकडे जाते आणि भांगेची गोळी शत्रूकडे येते. या सगळ्या गडबडीमुळेच सूर्या आणि डॅडी भांग पितात. तर शत्रू जुलाब गोळी मिसळलेलं जेवण जेवतो. त्यानंतर सूर्या आणि डॅडींना भांग चढते, ते एकमेकांकडे बघून सतत हसताना दिसत आहे. तर शत्रू शौचालयासाठी खाली वर करताना पाहायला मिळत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या या प्रोमोने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: “लवकर लग्न करा”, ‘बिग बॉस मराठी’ फेम वैभव चव्हाण आणि इरिनाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्हाला वहिनी हिच पाहिजे”

पाहा प्रोमो

हेही वाचा – Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सोनू निगमच्या समोर अचानक आला मद्यपी अन् मग…; पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. नुकत्याच झालेल्या ‘झी मराठी पुरस्कार २०२४’मध्ये या मालिकेला बरेच पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट दादा, सर्वोत्कृष्ट बहीण, सर्वोत्कृष्ट खलनायक हे पारितोषिक ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेने जिंकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek amcha dada serial upcoming twist surya and daddy drank bhang pps