Lakhat Ek Amcha Dada Upcoming Episode : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आजपासून तुळजाचा लग्नसोहळा सुरू होणार आहे. नऊ दिवस हा लग्नसोहळा रंगणार असून ६ सप्टेंबरला तुळजा नेमकी कोणाशी लग्नगाठ बांधणार सिद्धार्थ की सत्यजितशी? हे उलगडणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) मालिकेतील लग्नसोहळा विशेषचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सूर्या तुळजाच्या लग्नाचं आमंत्रण देताना दिसत आहे. “काय मग मंडळी बातमी समजली का? आपल्या तुळजाच लग्न ठरलंय”, ही आनंदाची बातमी देत सूर्या लग्नातील समारंभ सांगताना पाहायला मिळत आहे. तुळजाच्या लग्नाचं आमंत्रण देताना सूर्याच्या मनात दुःख व आनंद या दोन्ही भावना निर्माण झाल्याचं त्याच्या चेहरावर दिसत आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – “सच्चा माणूस…”, ‘बिग बॉस मराठी’ विजेता अक्षय केळकरकडून सुरज चव्हाणवर स्तुतीसुमने, म्हणाला, “तो शांत दिसतो पण…”

Lakhat Ek Amcha Dada

पुढे सूर्या लग्न समारंभरातील तुळजाच्या लूकविषयी बोलत आहे. तो म्हणतो, “मुंडवळ्या बांधलेली तुळजा कसली गोड दिसेल ना? त्यात तिच्या तळ हातावर मेहंदी रंगणार, तिच्या गोऱ्या हातामधला हिरवा चुडा शोभून दिसणार, आई शप्पथ सांगतो हळदीत नाहून गेलेलं तुळजाचं रुपडं कसलं खुलून दिसलं. कारण तुळजाचं लग्न तिला सुखात ठेवणाऱ्या पोराशी होणार आहे. पण सूर्या तुळजाचं स्वप्न पूर्ण करणार की डॅडींचा विश्वास जपणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ( Lakhat Ek Amcha Dada )

हेही वाचा – Video: “गोविंदा रे गोपाळा…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

आज आणि उद्या (२८ ऑगस्ट) तुळजाच्या लग्नाचा मुहूर्तमेढ असणार आहे. त्यानंतर २९ आणि ३० ऑगस्टला तुळजाच्या हातावर मेहंदी रंगणार आहे. ३१ आणि १ सप्टेंबर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. ३ आणि ४ सप्टेंबरला तुळजाला हळद लागणार आहे आणि अखेर ६ सप्टेंबरला तुळजा लग्नबंधनात अडकणार आहे. पण तुळजा सिद्धार्थ की सत्यजितशी लग्नगाठ बांधणार? की भलंतर काहीतरी घडणार? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. ( Lakhat Ek Amcha Dada )

Story img Loader