Lakhat Ek Amcha Dada Upcoming Episode : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत आता मोठा ट्वीस्ट आला आहे. तुळजाच लग्न सिद्धार्थ किंवा सत्यजीतशी न होता सूर्याबरोबर झालं आहे. भर मंडपातून सूर्या तुळजाला तिच्या आवडता जोडीदार म्हणजेच सिद्धार्थबरोबर लग्न करण्यासाठी पळवून नेतो. पण यामुळे मोठा गैरसमज निर्माण होता. सूर्यानेच लग्न करण्यासाठी तुळजाला पळवून नेल्याचं पसरतं. त्यामुळे रागाच्या भरात डॅडी तुळजाचं लग्न सूर्याशी लावून देतात.
सूर्या डॅडींच्या हातापाया पडतो. पण संतापलेले डॅडी सूर्याला समोर उभा करून घेत नाही. कारण सूर्या त्यांचा विश्वासघात करतो. एकीकडे डॅडी तुळजाचं लग्न सूर्याशी लावून देतात आणि दुसरी ते तुळजा आपल्यासाठी मेली असल्याचं जाहीर करतात. नुकताच ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आला आहे. यामध्ये तुळजा गृहप्रवेश दाखवण्यात आला आहे.
हेही वाचा – Video: “सर्वात आधी घाव तुझ्यावर आणि माझ्यावर घालणार…” धनंजय पोवार अंकिताला कोणाविषयी असं बोलला? जाणून घ्या…
‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर पेजवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये एकीकडे तुळजाचा जगतापाच्या घरी गृहप्रवेश होताना दिसत आहे. तर दुसरीकडे डॅडी तुळजा आपल्यासाठी मेल्याचं सांगून तिच्या फोटोची पूजा करताना पाहायला मिळत आहेत. गृहप्रवेश करताना तुळजा शून्यात असलेली दिसत आहे. यावेळी तिला सूर्याची बहीण राजश्री हळद कंकू लावून गृहप्रवेश करायला सांगते. “आता हे माप ओलांड आणि लक्ष्मीच्या रुपाने आमच्या घरात पाऊल टाकून या घरची होऊन जा.” त्याच वेळी सत्यजीत घरच्यांना सांगतो की, डॅडींनी तुळजाचं लग्न सूर्याशी लावून दिलं आहे. हे ऐकून शशिकांतला राग येतो. तो म्हणतो, “जालिंदररावांनी आतापर्यंत आपला मान बघितला आहे. आता आपली दुश्मनी बघत राहतील.”
हेही वाचा – भारतात परतल्यावरचा मृणाल दुसानिसचा पहिला गणेशोत्सव, स्वतःच्या नऊवारी साडीचा वापर करून केली सजावट, म्हणाली…
दुसऱ्या बाजूला तुळजाचा फोटो पूजन डॅडी म्हणतात, “आजपासून तुळजा माझ्यासाठी मेली. इथून पुढं या घरात तिच नाव कधीपण निघायला नाही पाहिजे.” तिकडे गृहप्रवेशाच्या वेळी तुळजा काहीही न बोलताना माप ओलांडून जगतापाच्या घरी प्रवेश करताना दिसत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो पाहा
दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत आता लग्नानंतर सूर्या आणि तुळजा पुढे काय करणार? दोघांचा संसार कसा असणार? डॅडी दोघांना आणखी काय-काय शिक्षा देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.