‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टरित्या साकारल्या आहेत. त्यामुळे लक्ष्मी, श्रीनिवास, भावना, जान्हवी, मंगला, संतोष, वीणा, हरीश, सिंचना अशी मालिकेतील सगळी पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. तसंच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं आहे. दिवसेंदिवस या मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढताना दिसत आहे.
दुसऱ्या बाजूला ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकार मंडळी ट्रेंडिंग गाण्यावर नेहमी रील व्हिडीओ करत असतात. नुकतंच या मालिकेतील कलाकारांनी शांता आजीबरोबर रील व्हिडीओ केला आहे; ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील मंगला म्हणजे अभिनेत्री स्वाती देवलने नवा रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्वातीसह अनुज ठाकरे ( हरीश ), मीनाक्षी राठोड ( वीणा ), महेश फाळके ( वेंकी ), सुप्रीती शिवलकर ( सुपर्णा ) आणि विनीता शिंदे ( शांता आजी ) दिसत आहे. या सहा जणांनी ‘झापुक झुपूक’ गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला पाहायला मिळत आहे. पण या सहाजणांमधील शांता आजीने आपल्या एनर्जेटिक डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याआधी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांचा ‘नटीन मारली मिठी’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता.
दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिका २३ डिसेंबर २०२४पासून सुरू झाली. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, दिव्या पुगांवकर अशी मोठी स्टारकास्ट आहे. ही मालिका एक तास प्रसारित होत असली तरीही प्रेक्षक वर्ग आवडीने बघताना दिसत आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लवकरच मालिकेतील जयंतचं सत्य लक्ष्मी आणि श्रीनिवाससमोर येणार आहे.