Lakshmi Niwas Fame Marathi Actress Haldi Ceremony : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत जयंत-जान्हवीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडल्यावर आता मालिकेतली जान्हवी म्हणजेच सर्वांची लाडकी दिव्या खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. या दोघांचा तिलक समारंभ २०२१ मध्ये पार पडला होता. यानंतर अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सर्वांची प्रतीक्षा आता संपली असून, दिव्याला अक्षयची उष्टी हळद लागलेली आहे. अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याला मनोरंजन विश्वातील तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी देखील उपस्थित राहणार आहेत.

दिव्याने हळदी समारंभासाठी अगदी साधा अन् सुंदर असा लूक केला होता. अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा लेहेंगा घालून त्यावर फुलांचे दागिने परिधान केले होते. तसेच या लूकवर दिव्याच्या हातातला हिरव्या बांगड्यांचा चुडा शोभून दिसत होता. सध्या दिव्याच्या हळदी समारंभातील Inside फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचे आई-बाबा तिला हळद लावताना भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच दिव्या पुगावकर ( Divya Pugaonkar ) आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं केळवण ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील तिच्या सह-कलाकारांनी हॉटेलमध्ये एकत्र जमून केलं होतं. दिव्याचा होणारा नवरा अक्षय हा फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे.

दरम्यान, मेहंदी सोहळा, साखरपुडा, संगीत सोहळा आणि आता हळद पार पडल्यावर दिव्या लग्नबंधनात अडकून एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे.

दिव्या पुगावकरच्या ( Divya Pugaonkar ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, यापूर्वी तिने ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘मुलगी झाली हो’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तर सध्या ती ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची म्हणजेच जान्हवीची व्यक्तिरेखा अभिनेत्री दिव्या पुगावकर साकारत आहे.