Lakshmi Niwas Fame Marathi Actress Mehendi Ceremony : ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्यावर्षीच्या अखेरीस ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका सुरू झाली. या मल्टीस्टारर कौटुंबिक मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. हर्षदा खानिवलकर यांनी या मालिकेत ‘लक्ष्मी’ तर, ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी यांनी या मालिकेत ‘श्रीनिवास’ची भूमिका साकारली आहे. लवकरच या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या सर्वात धाकट्या मुलीची म्हणजेच जान्हवी दळवी या पात्राची भूमिका मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर साकारत आहे. काही दिवसांपूर्वी या जान्हवी आणि जयंतचा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडण्यात आला. जयंत-जान्हवीच्या लग्नाबद्दल सगळीच प्रेक्षकमंडळी उत्सुक होती. मात्र, जान्हवीची भूमिका साकारणारी दिव्या पुगावकर लवकरच वैयक्तिक आयुषयात बोहल्यावर चढणार आहे.

दिव्या लग्नबंधनात अडकणार असल्याने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील तिच्या सहकलाकारांनी नुकतंच तिचं केळवण आयोजित केलं होतं. यावेळी सेटवरची कलाकारमंडळी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. याशिवाय अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसाठी खास लग्नपत्रिकेची झलक सुद्धा शेअर केली होती. यानंतर दिव्याने बुधवारी रात्री ( १२ फेब्रुवारी ) ‘Bride to Be’ चे फोटो सुद्धा शेअर केले होते. आता दिव्या पुगावकरच्या हातावर अक्षयच्या नावाची मेहंदी सजली आहे.

‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीच्या हातावर सजवली मेहंदी ( Lakshmi Niwas )

मेहंदी सोहळ्यासाठी दिव्याने भरजरी सुंदर असा ड्रेस घातला होता. तिच्या घरातही या मेहंदी सोहळ्यासाठी सुंदर सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे. दिव्याने यावर, “आता सुरुवात झाली…” असं कॅप्शन देत या पोस्टमध्ये तिच्या नवऱ्याला देखील टॅग केलं आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/divya.mp4

दरम्यान, दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे. या दोघांचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.