Lakshmi Niwas Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांना होळीनिमित्त सगळ्या मालिकांचा विशेष महासंगम पाहायला मिळाला. यावेळी वाहिनीवर सुरू असणाऱ्या विविध मालिकांमधील जोड्यांनी भन्नाट डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पारू-आदित्य, सावली-सारंग, भावना-सिद्धू यांच्या पाठोपाठ आणखी एका जोडीने या विशेष भागात जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. ही जोडी म्हणजे ‘लक्ष्मी निवास’ फेम जयंत आणि जान्हवी.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच जयंत आणि जान्हवीचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नानंतर आता हळुहळू जान्हवीसमोर तिच्या नवऱ्याचं वेगळंच रुप समोर येऊ लागलं आहे.
लग्न झाल्यापासून, जयंतचा सगळा विकृतपणा मुकाट्याने सहन करत जान्हवीने या सगळ्या गोष्टी तिची आई म्हणजेच लक्ष्मीपासून लपवून ठेवलेल्या असतात. म्हणूनच खोटा मुखवटा धारण करून जान्हवीच्या माहेरच्या लोकांसमोर जयंत नेहमीच तिच्याशी प्रेमाने वागतो असं मालिकेत पाहायला मिळतंय. जान्हवी सुद्धा प्रेम-प्रेम म्हणून नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी पाठीशी घालत असते. एकंदर ही जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे.
जयंत आणि जान्हवीने महासंगमच्या भागांमध्ये देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या जोडप्याने एका लोकप्रिय मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. ‘ये गो ये मैना, पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का’ या ‘जत्रा’ सिनेमातील गाण्यावर दोघांनी भन्नाट डान्स केला. हे एव्हरग्रीन गाणं आज इतकी वर्षे उलटून गेल्यावरही घराघरांत तेवढंच लोकप्रिय आहे.
जयंत आणि जान्हवीने होळीनिमित्त पार पडलेल्या विशेष भागात ‘ये गो ये मैना’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. हा डान्सचा व्हिडीओ ‘झी मराठी’ वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
दरम्यान, ‘ये गो ये मैना’ गाण्यावर डान्स करताना जयंत आणि जान्हवीने वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. या जोडप्याचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक करण्यात येत आहे. जयंत अन् जान्हवीची डान्सिंग केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.