‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिका सध्या खूप चर्चेत आहे. तगडी स्टारकास्ट असणारी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील एका अभिनेत्रीने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. ही आनंदाची बातमी नुकतीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत संतोषची पत्नी वीणा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोडचं मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तिने पती, अभिनेता कैलास वाघमारेच्या साथीने गोरेगावमध्ये नवीन घर घेतलं आहे. ही आनंदीची बातमी देण्यासाठी मीनाक्षीने खास पोस्ट शेअर केली आहे.

“मुक्काम पोस्ट गोरेगाव मुंबई…स्वप्नाच्या शहरात हक्काचं घर…थँक्यू मुंबई…तुझ्यात सामावून घेतलं…”, असं कॅप्शन लिहित मीनाक्षी राठोडने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मीनाक्षी, कैलास आणि त्यांची लेक यारा पाहायला मिळत आहे. या फोटोमधील नव्या घराच्या नेमप्लेटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मीनाक्षी व कैलासने नव्या घराच्या नेमप्लेटवर लेकीच्या नावाला अधिक प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. यारा, मीनाक्षी, कैलास असं नेमप्लेटवर लिहिण्यात आलं आहे.

या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, दिव्या पुगावकर, सुयश टिळक, रेश्मा शिंदे, साक्षी गांधी, गिरीजा प्रभू, अक्षया देवधर, माधवी निमकर, केतकी विलास, नंदिता पाटकर, अश्विनी कासार, स्वाती देवल अशा अनेक कलाकारांनी मीनाक्षी आणि कैलासला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, मीनाक्षी राठोडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘लक्ष्मी निवास’ आधी ‘अबोली’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मलिकांमध्ये काम केलं होतं. ‘अबोली’ मालिकेतील निता सुर्वे आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील देवकी या भूमिका मीनाक्षीने उत्कृष्टरित्या साकारल्या होत्या. तिने या भूमिका आपल्या दमदार अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या होत्या. आतादेखील ‘लक्ष्मी निवास’मधील वीणाच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

मीनाक्षीचा पती कैलास हा देखील उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मीनाक्षी व कैलासला अडीच वर्षांची मुलगी आहे, जिचं नाव यारा आहे. याराचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.

Story img Loader