आज ‘महापरिनिर्वाण दिन’. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झालं. त्यामुळे या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना स्मरणार्थ ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा केला जातो. या दिवशी मुंबईतल्या दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पोहोचतात. सध्या सोशल मीडियावर अनेक मराठी कलाकार मंडळी पोस्ट करून बाबासाहेबांना अभिवादन करताना दिसत आहेत. अशातच ‘झी मराठी’वर लवकरच सुरू होणाऱ्या ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेतील अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीवर २३ डिसेंबरपासून ‘लक्ष्मी निवास’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया नाईक, दिव्या पुगावकर असे बरेच कलाकार झळकणार आहेत. या मालिकेत देवकी म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीनाक्षी राठोड पाहायला मिळणार आहे. याच मीनाक्षी राठोडने डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्येच मीनाक्षीने लेक याराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18मधील ‘या’ सदस्याला दारू सोडण्यासाठी सुशांत सिंह राजपूतने केली होती मदत, म्हणाला, “त्याने मला एक डायरी दाखवली…”

या व्हिडीओमध्ये यारा ‘माझा भिमराय’ गाणं गाताना दिसत आहे. यात यारा गाण्यातील प्रत्येक शब्द स्पष्टपणे गाताना पाहायला मिळत आहे. याराच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इतर कलाकार मंडळींसह चाहते याराचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा – Video: “आई ही माझी बेस्ट फ्रेंड…” स्वप्नील जोशीने आईच्या ७४व्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “माझं आयुष्य…”

दरम्यान, मीनाक्षी राठोडचा पती, अभिनेता कैलास वाघमारे आहे. १० मे २०२२ रोजी मीनाक्षी आणि कैलासला कन्यारत्न प्राप्त झालं. त्यानंतर चार महिन्यांनी दोघांनी त्यांच्या गोंडस लेकीचं ‘यारा’ असं नाव ठेवलं. यारा आता अडीच वर्षाची आहे.

हेही वाचा – “एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे”, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानिमित्ताने सलील कुलकर्णींची खास पोस्ट, म्हणाले…

मीनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत मीनाक्षीनं साकारलेली निता सुर्वेची भूमिका सुरुवातीला अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने साकारली होती. हे पात्र शर्मिष्ठाने आपल्या अभिनयाने एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं. पण मीनाक्षीनं शर्मिष्ठानंतर निता पात्र उत्कृष्टरित्या पेललं. अजिबात तिनं निता पात्रातील बदल जाणवू दिला नाही. याआधी मीनाक्षी राठोडने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत देवकीचं पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. पण काही काळानंतर मीनाक्षीनं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सोडली. मात्र तिनं साकारलेली देवकी अजूनही प्रेक्षकांच्या मनात अढळ आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi niwas fame meenakshi rathod daughter yara sing majha bhimraya song pps