काही मालिका या कमी अवधीत प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ‘लक्ष्मी निवास'(Lakshmi Niwas) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लक्ष्मी, श्रीनिवास यांचे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. या कुटुंबात श्रीनिवासची आई, त्यांची दोन मुले, दोन सुना, दोन मुली व एक मानलेला मुलगा वेंकी आहे. सर्वांचे भिन्न स्वभाव, विचार करण्याच्या वेगळ्या पद्धती, कोणी प्रेमळ, निस्वार्थी तर कोणी फक्त स्वत:चा विचार करणारे, स्वार्थी, कोणी पैशामागे धावणारा, कोणी आहे त्यात समाधानी राहणारा अशा नानाविध प्रकारचे स्वभाव असलेले सदस्य या कुटुंबात पाहायला मिळतात. या सर्वात लक्ष्मी व श्रीनिवास यांना मात्र त्यांच्या मुलीच्या लग्नाची चिंता आहे. याबरोबरच, स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून आहेत. आता मालिकेत नवीन वळण येताना दिसत आहे. लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो समोर आला असून सिद्धू भावनाच्या घरी पोहोचणार असल्याचे पाहायला मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा