मुलींची लग्न थाटामाटात करण्याचं व घर बांधण्याचं स्वप्न घेऊन लक्ष्मी व श्रीनिवास ही पात्रे काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. झी मराठी वाहिनीवर लक्ष्मी निवास(Lakshmi Niwas) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून लक्ष्मी व निवासच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच भावनाचे लग्न ठरले होते. श्रीकांत व भावनाच्या लग्नासाठी सगळे उत्सुक असल्याचे दिसत होते. श्रीकांतला आनंदी ही मुलगी आहे. भावनाबरोबरचे त्याचे हे दुसरे लग्न आहे. आनंदीसाठी भावना व श्रीकांत लग्नासाठी तयार झाले आहे. आता मात्र भावनाच्या आयुष्यात नवीन वादळ येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भावनाच्या आयुष्यात नवीन वादळ

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, भावना व श्रीकांतच्या लग्नाचा दिवस आहे. भावना मंडपात येऊन बसली आहे. लक्ष्मी-श्रीनिवासच्या घरातील सर्व मंडळी हजर असून पाहुण्यांनीदेखील हजेरी लावली आहे. श्रीकांत व त्याचे कुटुंब अद्याप पोहोचायचे आहे. श्रीकांत, त्याची आई व छोटी आनंदी ज्या गाडीत आहेत, त्या गाडीला मोठा अपघात होतो. जान्हवीचा मित्र विश्वा येऊन सांगतो की, भावनाताईच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. हे ऐकताच भावना तिथून उठते आणि श्रीकांतला दाखल केलेल्या दवाखान्यात तिच्या कुटुंबासह पोहोचते. तिथे श्रीकांतची बहीण व तिचा नवरा भावनाच्या पत्रिकेत दोष असल्याने श्रीकांत व त्याच्या कुटुंबाचा अपघात झाला असल्याचे म्हणतात.

भावना श्रीकांतच्या आईला आनंदीची काळजी घेईन, असे वचन देते. हे ऐकल्यानंतर श्रीकांतची आई प्राण सोडते. त्यानंतर डॉक्टर भावना व तिच्या कुटुंबाला म्हणतात, “आय अ‍ॅम सॉरी, आम्ही श्रीकांतसरांना वाचवू शकलो नाही.” श्रीकांतची बहीण मोठमोठ्याने रडताना दिसत आहे. श्रीकांतची बहीण भावनामुळे सगळं झालं आहे, असे म्हणते. त्यानंतर ती व्हीलचेअरवरून आनंदीला नेत असल्याचे दिसत आहे. आनंदी व्हीलचेअरवरून खाली पडते आणि भावना आई म्हणून मोठ्याने ओरडते. भावनाचे नाव ऐकताच श्रीकांतच्या बहिणीला राग येतो आणि ती आनंदीवर सारखं काय भावना भावना आई म्हणतेस म्हणून हात उगारते. भावना तिला अडवते. भावना आनंदीला घरी घेऊन येते. ती तिच्या कुटुंबाला सांगते की, आजपासून आनंदी माझ्याबरोबर इथेच राहतील. त्यावर तिचा मोठा भाऊ तिला म्हणतो, “आयुष्यभर आई-बाबांनी या वेंकीला पोसलं आणि तू आता हिला पोस. म्हणजे हे आपलं घर नाही; धर्मशाळा आहे.”

हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, “अघटित घडणार; मात्र भावना आयुष्यभरासाठी एक महत्त्वाची जबाबदारी घेणार…!”

नेटकरी काय म्हणाले?

‘लक्ष्मी निवास’चा हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी या प्रोमोवर कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “श्रीकांत आणि भावनाची जोडी खूप आवडली होती. मालिका भारी वाटली होती; पण आता सगळा रस गेला.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “खूप इच्छा होती, पुढे बघायची”, असे लिहित दु:खी इमोजी शेअर केली आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जर तुम्हाला श्रीकांत व भावनाची जोडी दाखवायची नव्हती. तर मग एवढ्या भारी कलाकाराला घ्यायची काय गरज होती. दुसरा कोणी साधारण कलाकार घेतला असता. ना त्यांची जोडी चांगली वाटली असती आणि ना सर्व प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला असता. सिद्धूपेक्षा श्रीकांतच खरा हीरो आहे. सगळं किती छान चाललं होतं. सगळा अपेक्षाभंग केला.”

हेही वाचा: 3 Idiots फेम अभिनेता ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत साकारतोय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?

आता मालिकेत पुढे काय होणार, श्रीकांत व त्याच्या आईच्या निधनामुळे भावना व आनंदीच्या आयुष्यावर काय परिणाम होणार, श्रीनिवास व लक्ष्मी या सर्वांना कसे सामोरे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi niwas promo srikanth accident on the wedding day he will die bhavna will take aanandis responsibility netizens reacts nsp