स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका आता घराघरांत पाहिली जातेय. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत लवकरच कला आणि अद्वैत राहुलचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहेत. राहुल रजनीच्या श्रीमंत मैत्रिणीच्या मुलीशी साखरपुडा करून, लग्न करण्याच्या तयारीत आहे; तर दुसऱ्या बाजूला नयनाचा तिच्या शाळेतल्या मित्राशी तिच्या मनाविरुद्ध साखरपुडा होणार आहे, असा सीक्वेल सध्या मालिकेत सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे राहुलविरुद्ध पुरावे गोळा करून, त्याच्या साखरपुड्याच्या दिवशी कला राहुलचं सत्य चांदेकर कुटुंबासमोर आणणार आहे, असं दिसत आहे. नयना आणि राहुल लग्नातून पळून गेल्यावर ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिथले पुरावे कलाने गोळा करून एका पेन ड्राइव्हमध्ये आणले आहेत. साखरपुड्याच्या दिवशी कला नयनाला घेऊन चांदेकर मॅन्शनमध्ये येते. राहुल मुलीला अंगठी घालणार इतक्यात कला त्यांना अडवते आणि म्हणते, “थांबा, हा साखरपुडा होऊ शकत नाही. नयनाताई लग्नातून राहुलबरोबर पळून गेली होती.”

अद्वैतला पेन ड्राइव्ह देऊन लग्नाच्या दिवशी नयना आणि राहुल ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याचं फुटेज कला सगळ्यांना दाखवते. “आणि एवढंच नाही, तर नयनाताई राहुलमुळे प्रेग्नंट आहे”, असं कला सगळ्यांना सांगते. हे ऐकताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि आबा राहुलच्या कानशिलात लगावतात. हा भाग १० एप्रिल रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा… खरे कुटुंबाची मजेशीर रील व्हायरल; नेटकरी म्हणाले, “ये औरत ना…”

हेही वाचा… Video: नारकर कपलचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश नारकरांची एनर्जी पाहून नेटकरी म्हणाले, “काका, जबरदस्त एकदम…”

एकीकडे कलानं राहुलचं सत्य चांदेकर कुटुंबासमोर आणलंय. या सत्यानंतर आता तरी चांदेकर कलाची बाजू घेतील का? राहुलला चांदेकर कुटुंब काय शिक्षा देणार? राहुलचा साखरपुडा मोडणार का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील भागांमध्ये करण्यात येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmichya pavalani new promo naina is pregnant kala revelead rahuls truth in front of chandekar family dvr