स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत नयनाचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे, त्यामुळे सर्वांनाच याचा मोठा धक्का बसला आहे. चांदेकरांच्या कुटुंबात यामुळे मोठा गोंधळ सुरू आहे. तसेच सरोज, आबा, अद्वैत, राहुल, रोहिणी कुटुंबातील सर्व सदस्य नयनाचा द्वेष करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशात आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये घडलेल्या घटनेनंतर नयनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. तिने असे केल्याने कला तिला हाताला धरून चांदेकरांच्या घरात आणते आणि तिला सर्वांची माफी मागण्यास सांगते. प्रोमो व्हिडीओमध्ये नयना सर्वात आधी आबांच्या पाया पडून त्यांची माफी मागते. तसेच अन्य सदस्यांचीसुद्धा माफी मागताना दिसते आहे.

प्रोमोमध्ये पुढे अद्वैत नयनाला कलाचीसुद्धा माफी माग, तू तिची सर्वात मोठी गुन्हेगार आहेस असं सांगतो. त्यावर नयना कलाच्या समोर उभी राहते आणि हात जोडून तिची माफी मागते, असं प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मालिकेचा हा भाग ३१ जानेवारीला रात्री ९.३० वा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे.

मालिकेत सध्या नयनाला तिने केलेल्या चुकीमुळे घराबाहेर काढण्यात आलं आहे. गरोदर असल्याचं नाटक करून तिने कुटुंबातील सर्वांची फसवणूक केली. तसेच तिच्या या कामात कलाचासुद्धा हात आहे असं सर्वांना वाटत होतं. कुटुंबातील व्यक्तींचा विश्वास जिंकण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कलाने काही पुरावे शोधले.

कला थेट डॉक्टर सौरभला घरी घेऊन आली, त्यावेळी सौरभला नयनाने कसं फसवलं आणि कलाची यात काहीच चूक नाही हे सर्व सांगितलं. सत्य समोर आल्यावर रोहिणी चांदेकरने नयनाला हात धरून घराबाहेर काढलं आहे. या सर्वात कला निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने अद्वैतच्या मनात तिच्या विषयीचा आदर आणखी वाढला आहे, त्यामुळे अद्वैत कलाची आणखी जास्त काळजी घेत आहे.

कलाला स्पेशल वाटावे यासाठी तो प्रयत्न करत आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत ईशा केसकरने कला चांदेकर ही भूमिका साकारली आहे, तर अद्वैत चांदेकर हे पात्र अभिनेता अक्षर कोठारी साकारत आहे. मालिकेतील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmichya pavalani new promo video nayana will apologize to kala because of advait rsj