‘लापतागंज’ या मालिकेती अभिनेत्याचं १२ जुलै रोजी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अरविंद कुमार असे या अभिनेत्याचे नाव आहे. अरविंद कुमार हे लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘लापतागंज’मध्ये चौरसियाच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मालिकेत सहायक भूमिका करून ते लोकप्रिय झाले होते.
सिंटाचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी अरविंद कुमार यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १२ तारखेला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद सध्या कामाच्या शोधात होते. करोनानंतरच्या काळात काम न मिळाल्याने ते आर्थिक संकटात होते, असंही जोशी यांनी सांगितलं. अरविंद यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
‘लापतागंज’चे लेखक अश्विनी धीर यांनी आपण सतत अरविंद यांना काम देत होतो असं सांगितलं. या कलाकारांना काही ना काही काम मिळत राहावं यासाठी माझा प्रयत्न राहिला आहे. ते आर्थिकदृष्ट्या किती मजबूत होता हे मला माहीत नाही, पण त्यांना कामाची खूप गरज होती. मी जूनमध्येच त्यांच्यासोबत चित्रपट शूट केला होता. मी लोणावळ्यात असताना त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. स्टुडिओमध्ये काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
“अर्जुन कपूरचं करिअर संपलंय,” बॉलीवूड अभिनेत्याची टीका; म्हणाला, “तो घरात बसून मलायकाची…”
‘लापतागंज’ या मालिकेत त्यांनी पाच वर्षे चौरसियाची भूमिका केली होती. याशिवाय त्यांनी ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे. ‘चीनी कम’, ‘अंडरट्रायल’, ‘रामा क्या है ड्रामा’ आणि ‘मॅडम मुख्यमंत्री’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला होता.