दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.प्रभास चित्रपटामध्ये भगवान राम यांच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसणार आहे. तर सैफ रावणाची भूमिका साकारत आहे. मात्र चित्रपटातील vfx आणि सैफ अली खानने साकारलेल्या भूमिकेवरून या चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. लोकांनी जुना रामायण मालिकेतील कलाकारांचे फोटो शेअर करण्यास सुरवात केली आहे. जुन्या रामायण मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या मालिकेत ज्या कलाकारांनी रामायणातील देवदेवतांच्या भूमिका केल्या होत्या त्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. या कलाकारांमध्ये भाव खाऊन गेले ते अरविंद त्रिवेदी, ज्यांनी रावणाची भूमिका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेला रावण आजही लोकांच्या लक्षात आहे मात्र अरविंद या भूमिकेसाठी आलेच नव्हते. याआधी मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर हे कलाकार निवडत होते तेव्हा त्यांना अनेक जणांनी सांगितले की रावणाच्या भूमिकेसाठी तुम्ही अमरीश पुरी यांना घ्या. अरविंद त्रिवेदी हे गुजरातमध्ये नाटकांमधून काम करत होते. रामायणावर मालिका बनत आहे ते त्यांना समजले तेव्हा ते तडक मुंबईत आले. सुरवातीला त्यांनी केवट या पात्रासाठी ऑडिशन दिली होती.

“कुणाचं भाषण कस झालं हे सांगण्यापेक्षा…” दिग्दर्शक विजू माने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दिग्दर्शक रामानंद सागर यांनी ऑडिशन घेतल्यावर त्यांना जाण्यास सांगितले, अरविंद निघताच रामानंद सागर यांनी त्यांना पुन्हा थांबवले आणि म्हणाले या मालिकेत तुम्ही रावणाची भूमिका करत आहात. अरविंद यांच्या हावभाव चालीवरून रामानंद सागर यांनी त्यांना रावणाच्या भूमिकेसाठी निवडले. त्यांना ‘रामायण’साठी अशा रावणाची गरज आहे, ज्याच्याकडे बुद्धीचे सामर्थ्य आहे आणि चेहऱ्यावर तेज आहे. अशा प्रकारे अरविंद त्रिवेदी यांना ‘रामायण’मध्ये अमरीश पुरीच्या जागी रावणाची भूमिका मिळाली.

करोना महामारीच्या काळात ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली होती. अनेक वर्षानंतरदेखील या मालिकेला प्रेक्षकांनी तितकीच पसंती दर्शवली होती. रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनी अनेक हिंदी चित्रपट काम केले आहे मात्र ते ओळखले गेले ते रावण या भूमिकेसाठी, ऑक्टोबर २०२१ साली त्यांचे निधन झाले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late actor amrish puri was first choice for ravaan role in ramayan serial spg