प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवलं. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. याप्रकरणी वालीव पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचासहकलाकार मोहम्मद शिझान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. शिझानने प्रेमसंबध तोडल्याने निराश झाल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती.

तुनिषा शर्मा सोशल मीडियावर सक्रीय असायची. तुनिषाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिने तिच्या मनगटावर प्रेमाशी संबंधित शब्दांचा टॅटू काढला आहे. त्याच्या मनगटावर लिहिलं होतं प्रेम सर्वात वरती, तिच्या टॅटूने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
Premachi Goshta Fame Rajas Sule Got to married photos viral
शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
ineligible for job due to tattoo
शरीरावर ‘टॅटू’ काढल्यामुळे नोकरीस अपात्र? न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय…
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”

वडिलांचा मृत्यू, लहान वयात सिनेसृष्टीत पदार्पण अन् नैराश्य; अभिनेत्री तुनिषा शर्माबद्दल या गोष्टी माहितीये का?

तुनिषा शर्माच्या प्रियकराला वसई कोर्टाने ४ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला.

तुनिषा शर्माचा जन्म चंडीगढचा, तिने वयाच्या १४ व्या वर्षी अभिनय करण्यास सुरुवात केली. तुनिषाने यापूर्वी ‘फितू’र, ‘बार बार देखो’, ‘दबंग ३’, ‘कहानी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिरीये, मन बसिया, तू बैठे मेरे सामने, यासह काही संगीत व्हिडिओंमध्ये देखील दिसली होती.

Story img Loader