अभिनेता अक्षर कोठारी सध्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत त्याने साकारलेली अद्वैत चांदेकरची भूमिका अल्पावधीत घराघरात पोहोचली आहे. पक्का बिझनेस मॅन, परफेक्शनिष्ट, पैशाचा माज असणारा, तत्वांना धरून चालणारा, मोठ्यांचा आदर करणारा आणि त्यांचा शब्द पाळणारा, स्वतःच्या जीवापेक्षा कुटुंबावर प्रेम करणारा, बोलणं इतकं टोकदार की कधी-कधी समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतो अशी भूमिका अक्षरने या नव्या मालिकेत साकारली आहे. अशातच अक्षरने अभिनेत्री रेश्मा शिंदेबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर मौनं सोडलं आहे.

अभिनेता अक्षर कोठारीने नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’ एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. तेव्हा अभिनेत्याबरोबर रॅपिड फायर हा खेळ खेळण्यात आला. यावेळी त्याला विचारलं की, स्वतःबद्दल ऐकलेली एक अफवा. यावर अक्षर म्हणाला, “मी आणि रेश्मा रिलेशनशिपमध्ये आहोत.”

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा – Video: लेकीबरोबर डान्स करतानाचा ऐश्वर्या राय-बच्चनचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “कधी तरी मुलीला…”

त्यानंतर अभिनेत्याला विचारलं, “या अफवेला उत्तर द्यायचं आहे?” तेव्हा अक्षर म्हणाला, “अजिबात नाही. मला माहित नाही ही अफवा कशी तयार झाली. पण मला आठवतंय, मी ‘स्वाभिमान’ मालिका सुरू असताना प्रश्नोत्तरांचं सेशन घेतलं होतं. तेव्हा मी विचारलं होतं की, माझ्याबद्दल अशी कुठली अफवा आहे का? यावर एका चाहत्याने सांगितलं होतं की, तू आणि रेश्मा रिलेशनशिपमध्ये आहात. त्याच्यावर मी गाणं टाकलं होतं. ‘कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना’ या गाण्यावर आमच्या दोघांचा एक फोटो शेअर केला होता. जो आमचा ऑफस्क्रीन काढलेला फोटो होता. ‘चाहूल’ मालिकेच्या वेळेचा तो फोटो होता. त्याच्यावरून अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. मला पेट्रोल पंपवर देखील विचारलं होतं, तू आणि रेश्मा रिलेशनशिपमध्ये आहात का? तर माझी रेश्मा ही चांगली मैत्रिण आहे. माझी पहिली मालिका ‘बंधन रेशमाचे’पासून तिच आणि माझं नातं आहे,” असं स्पष्ट अक्षरने सांगितलं.

हेही वाचा – मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नईत अडकलेला आमिर खान, दाक्षिणात्य अभिनेत्याने शेअर केले बचावकार्याचे फोटो

दरम्यान, अक्षरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेच्या पूर्वी ‘स्वाभिमान’, ‘कमला’, ‘छोटी मालकीण’, ‘चाहूल’, ‘बंध रेशमाचे’ अशा अनेक मालिकांमध्ये झळकला होता.

Story img Loader