स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं. तसंच कला-अद्वैतच्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ घातली. या मालिकेतील प्रत्येक पात्र तसं लोकप्रिय ठरतंय.
खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या नैनेचा आणि तिच्या जोडीला असलेल्या राहुलचा ऑफस्क्रिन बॉन्ड तसाच काहीसा खास आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मालिकेच्या सेटवरील धम्माल-मस्ती आणि रील्स दोघंही चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच दोघांचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हेही वाचा… “करण जोहरला तुला भेटण्याची इच्छा नाही” हे ऐकताच ‘या’ अभिनेत्याचं दुखावलं मन, किस्सा सांगत म्हणाला…
नैना आणि राहुल म्हणजेच अपुर्वा सकपाळ आणि ध्रुव दातार या दोघांनी ‘पुष्पा-२’ च्या सूसेकी गाण्यावर डान्स केला आहे. सध्या ‘पुष्पा-२’ चित्रपटातील “सुसेकी” गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकार या गाण्यावर हुक स्टेप करत थिकरताना दिसतायत. नैना आणि राहुलनेदेखील हटके अंदाजात डान्स स्टेप करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत नैनाने हिरव्या रंगाची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज परिधान केलं आहे तर ध्रुवने प्रिंटेड शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्सची निवड केली आहे. या ऑनस्क्रिन कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
हेही वाचा… “नजर लागणार अशी…”, ‘ठरलं तर मग’ फेम केतकी पालवचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
“नैना-राहुल ‘मेरा सामे’ घेऊन परत आले आहेत” असं कॅप्शन ध्रुवने या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “शेवटी नैनाने तुला तिच्या तालावर नाचवलंच राहुल” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर आहे.”
हेही वाचा… “सूसेकी…”, सुकन्या मोनेंना पडली ‘पुष्पा-२’ च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल
अनेकांनी अपुर्वाला तिच्या भूमिकेवरून तर ट्रोल केलंच आहे पण काहींनी कमेंट करत या डान्समधील तिच्या हावभावावरून तिला खडेबोल सुनावले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “नैना नाचताना जरा ते तोंड नीट करत जा.” तर एकजण कमेंट करत म्हणाला, “नैना कृपया करून पुढच्या वेळेस डान्स करताना ओव्हरअॅक्टिंग करू नकोस.”
दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अपूर्वा सकपाळ आणि धृव दातार यांची खलनायकाची भूमिका आहे. तर ईशा केसकर आणि अक्षर कोठारी प्रमुख भूमिकेत आहे. तसंच रोहिणी नाईक, रुत्विक तळवलकर, दिपाली पानसरे, अभय खडपकर, किशोरी अंबिये अशा अनेकांच्या भूमिका यात आहेत.