‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कला म्हणजेच ईशा केसकर सध्या चर्चेत आहे. ही मालिका अगदी काही वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. कला-अद्वैतच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरूम प्रेम मिळतंय. कलाची भूमिका साकारणारी ईशा केसकर हिनं २०१३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वी आर ऑन होऊन जाऊ द्या’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण, झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील तिची बानू ही भूमिका खूपच मोठ्या प्रमाणात गाजली.
ईशा सध्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय. अनेकदा ईशा या मालिकेच्या सेटवरील धमाल, मस्ती चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. ईशा सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. आता ईशानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक डान्स व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे.
सगळीकडेच आता पुष्पा ट्रेंड सुरू आहे. या चित्रपटातील ‘सूसेकी’ हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. अनेक भाषांमध्ये हे गाण रीलिज करण्यात आलं आहे. आता याच गाण्यावर ईशा थिरकली आहे. पण, यातही थोडा ट्विस्ट आहे. या गाण्याला ईशानं ‘एक लाजरा न साजरा मुखडा’ या मराठी गाण्याची जोड दिली आहे.
हेही वाचा… ‘पारू’ फेम शरयू आणि पूर्वा पुन्हा एकदा थिरकल्या ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर, VIDEO व्हायरल
हुक स्टेप्स आणि हटके डान्सच्या स्टेप्स करीत ईशानं चाहत्यांना भुरळ घातली आहे. ईशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. चाहत्यांनी ईशाचं कौतुक करण्यासाठी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “निशब्द…. ज्यांनी स्वतः तुला डोळ्यांसमोर पाहिलं तो खरा नशीबवान.” तर दुसऱ्यानं “तुझ्या डोळ्यांत जादू आहे”, असं म्हटलंय. एका युजरनं तिला मराठी रश्मिकादेखील म्हटलं आहे.
दरम्यान, ईशा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत कलाची प्रमुख भूमिका साकारत आहे. ईशाबरोबरच या मालिकेत अक्षर कोठारी, अपूर्वा सकपाळ, धृव दातार, रोहिणी नाईक, रुत्विक तळवलकर अशा अनेकांच्या निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत.