मालिका आणि प्रेक्षकांचं एक अतुट नातं आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मनोरंजनासाठी प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या मालिका आवर्जुन न चुकता पाहत असतात. त्यामुळे मालिका या लोकप्रिय ठरतात. गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिकाविश्वात अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता ‘स्टार प्रवाह’ या लोकप्रिय वाहिनीवर पुन्हा एक नवीन मालिका सुरू होणार आहे. नुकताच या नव्या मालिकेचा पहिला वहिला प्रोमो समोर आला आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला कोणते जंक फूड्स आवडतात? जाणून घ्या…

Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

४ सप्टेंबरला ‘स्टार प्रवाह’वर अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्यानंतर आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला.

हेही वाचा – “आईचे दागिने, मैत्रिणीचे कपडे अन्…”, घराचा EMI भरण्यासाठी केतकी माटेगावकरने केली अशी बचत; म्हणाली…

“‘माझ्या तीन लेकी ज्या कोणाच्या घरात जातील त्या लक्ष्मीच्या पाऊलांनी’…” असं लिहीत ‘स्टार प्रवाह’ने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा अभिनेता अक्षर कोठारी, अभिनेत्री ईशा केसकर आणि किशोरी अंबिये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा – “तुझं लग्न कधी आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी म्हणाली, “पत्रिका…”

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका २० नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. रात्री ९.३० ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता या मालिकेच्या वेळेत सध्या सुरू असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ प्रेक्षकांचा निरोप घेणार की नव्या वेळेत पाहायला मिळणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Story img Loader