तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनंतर आता आणखी एक ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवी मालिका सुरू होत आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (Laxmichya Paulanni) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेचा कालच पहिला प्रोमो प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये अभिनेत्री किशोरी अंबिये आणि ईशा केसकर झळकल्या. तेव्हापासून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच ही मालिका सुद्धा बंगाली आणि हिंदी भाषेतील एका मालिकेचा रिमेक असल्याचं म्हटलं आहे.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

हेही वाचा – स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद?, प्रेक्षकही म्हणाले, “अखेर तो क्षण आला…”

तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ‘ये है मोहब्बतें’ या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिमेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘स्टार जलशा’वरील लोकप्रिय बंगाली मालिका ‘गातचोरा’ (Gaatchora) आणि ‘स्टार प्लस’वरील ‘तेरी मेरी डोरियाँ’ (Teri Meri Doriyaann) या मालिकेचा रिमेक ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका असल्याचं म्हटलं आहे जात आहे.

हेही वाचा – अवघ्या तीन महिन्यातच गुंडाळावी लागली ‘ही’ मालिका; अचानक घेतला प्रेक्षकांचा निरोप

दरम्यान, ईशा केसकर आणि अक्षर कोठारीची ही नवी मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. अखेर काल या मालिकेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Story img Loader