एजे व लीला ही दोन पात्रे दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना भूरळ घालते. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेतील एजे व लीला ही पात्रे आहेत. वेगळे कथानक, विविध छटा असलेली अनेकविध पात्रे, गंभीर विषयांसह विनोदी तडका, थोड्या कुरबुरी पण दुसरीकडे तितकेच प्रेम, या सगळ्यात कलाकारांचा उत्तम अभिनय, यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते. आता मात्र प्रेक्षकांची ही लाडकी पात्रे एका वेगळ्या रूपात भेटीसाठी येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लीला-एजेचा हटके लूक

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एजे व लीला यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही अत्यंत वेगळे दिसत आहेत. लीलाने एक घट्ट वेणी घातली असून त्याला लाल रीबन बांधली आहे. त्याचबरोबर केसात गजरादेखील माळला आहे. कपाळावर मोठी टिकली दिसत आहे. गळ्यात धागा बांधलेला दिसत आहे, तर दुसरीकडे नेहमी सुटाबुटामध्ये दिसणारा एजेचा लूक हा गुंडासारखा दिसत आहे. त्याच्या हाताच्या मनगटाला कपडा गुंडाळलेला असून कडेदेखील घातले आहे. डोळ्यांना गॉगल घातला असून शर्टाची काही बटणे त्याने लावली नसल्याचे पाहायला मिळत आहे. लीला व एजे या नवीन गेटअपमध्ये नेहमीपेक्षा अत्यंत वेगळे दिसत आहेत. आता एजे व लीलाचा हा नवीन अवतार पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी अनेकविध कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

एजे व लीलाचे हे नवीन रूप पाहिल्यानंतर मालिकेत पुढे नक्की काय होणार, याचा प्रेक्षकांनी अंदाज वर्तवला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “आता यांचा डबल रोल दाखवू नका प्लीज. पुन्हा त्यांना दूर करायचा प्लॅन तर नाही ना डारेक्टर साहेब”, दुसर्‍या एका नेटकऱ्याने , “आमचे पुष्पा-श्रीवल्ली. पण, हे खूप विनोदी दिसत आहेत”, असे लिहित पुढे हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने लिहिले, “मला एजे शिवासारखा दिसतोय”, तर काही नेटकऱ्यांनी ही पार्टी थीम असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: रिचा चड्ढा-अली फैजल चिमुकल्या लेकीशी ‘असा’ साधतात संवाद, तिच्यासाठी गातात ‘हे’ गाणं

नवरी मिळे हिटलरला मालिकेत दाखविल्याप्रमाणे एजेला नुकतीच तो लीलाच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली आहे. आता तो त्याच्या भावना लीलाला कधी सांगणार, एजे व लीला यांनी असा हटके लूक का केला असेल, मालिकेत पुढे काय घडणार, एजे व लीला एकत्र येऊ नये म्हणून त्यांच्या सुना नेमके काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leela aj new look navri mile hitlarla marathi serial netizens says pushpa srivalli nsp