टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनतात. मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार, याची प्रेक्षकांना कायम उत्सुकता लागलेली असते. काही मालिका अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशा मालिकांपैकी एक म्हणजे नवरी मिळे हिटरलला ही मालिका आहे. आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला, ज्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
“घरच्या आनंदात मिठाचा खडा टाकणाऱ्याला या घरात जागा नाही”
‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला एजे लीलाला सांगतो की, ज्यांनी कोणी सापगोळ्या धुपाच्या जागी ठेवल्या, त्या व्यक्तीला माझ्यासमोर उभं कर. त्यानंतर श्वेता आणि लीला किचनमध्ये असल्याचे पाहायला मिळते. श्वेता लीलाला म्हणते की, प्रसादाची खीर असेल ना ती तूच कर. त्यानंतर ती खीर आजी खात असून, त्यांना ठसका लागल्याचे दिसत आहे. त्यावेळी श्वेता म्हणते की, खारट लागतेय ना खीर? त्यानंतर आजी म्हणतात की, घरच्या आनंदात मिठाचा खडा टाकणाऱ्याला या घरात जागा नाही.
आजीने असे म्हणताच सरस्वती म्हणते की, हे जे काही केलंय ना ते सगळं श्वेतानं केलंय. सरस्वतीने असे म्हणताच श्वेता तिला विचारते की, तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? लीला म्हणते की, माझ्याकडे आहेत पुरावे. त्यानंतर ती तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सगळ्यांना दाखवते. हे पाहिल्यानंतर एजे म्हणतो की, हिला या घरात जागा नाही. त्यानंतर लक्ष्मी श्वेताला हाताला धरून बाहेर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, ‘श्वेताला घराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार..!’, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे श्वेता आणि एजे यांचे लग्न ठरलेले असते. मात्र, रेवतीला किडनॅप करून, एजेबरोबर लग्न करण्याची धमकी दिली जाते. तसे केले, तरच रेवतीचा जीव वाचू शकतो, असे तिला सांगितले जाते. त्यामुळे लीला श्वेताला बेशुद्ध करते आणि तिच्या जागी स्वत: मंडपात बसते. एजे आणि लीलाचे अशा प्रकारे लग्न होते. श्वेता ही लक्ष्मीची नातेवाईक असल्याने ती त्यांच्या घरी राहायला येते. एजे आणि लीलाचे लग्न मोडावे यासाठी ती सतत प्रयत्न करताना दिसते. त्याबरोबरच श्वेता ही लक्ष्मी, सरस्वती यांच्या मदतीने लीलाला त्रास देत असते. आता मात्र श्वेताला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.