एजे व लीला ही पात्रे घराघरात पोहोचली असून, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) मालिकेतील ही पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. एजे-लीलामधील बॉण्डिंग प्रेक्षकांना जितके भावते, तितकीच त्यांच्यातील छोटी-मोठी भांडणेदेखील आवडतात. लीला वेंधळेपणाने काम करीत, जितके प्रेक्षकांचे मनोरंजन करते, त्याप्रमाणेच ती एखाद्या भावूक संवादात प्रेक्षकांनाही भावूक करताना दिसते. एजेचा परफेक्टनेस सगळ्यांना आवडतो; मात्र जेव्हा तो लीलाचा विचार करतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून, लीलाला एजेची आठवण येत असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण

नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लीला तिच्या सुनांना जाब विचारत आहे. लीला लक्ष्मीला म्हणते, “तू डिलिव्हरीची वाट लावलीस आणि सरस्वती तू जेवणाची. मी सांगितलेली कामं कोणीही केली नाहीत.” तिचे हे बोलणे ऐकून दुर्गा म्हणते, “आम्ही तर आमची कामं केली आहेत. पण, तुम्ही ती विचार करून वाटली असती, तर ती पूर्णसुद्धा झाली असती.” त्यानंतर दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती निघून जातात. दुर्गाचे बोलणे ऐकून लीला नाराज होते. आजी तिथेच बसून घडलेला प्रकार पाहत असल्याचे दिसते. त्या लीलाला म्हणतात, “चुका सगळ्यांच्या हातून होतात आणि चुकांमधूनच शिकायचं असतं.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, लीला तिच्या रूममध्ये आली असून, ती रडत आहे. रडत-रडत ती स्वत:शीच बोलताना म्हणते, “आज मी सगळी गडबड केली. एजे या ना लवकर”, तितक्यात तिला गाडीचा हॉर्न ऐकू येतो. एजे गाडीतून उतरत असल्याचे पाहायला मिळते. लीला आनंदात दरवाजा उघडते आणि एजेला मिठी मारते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “घडलेल्या प्रकारामुळे दु:खी झालेल्या लीलाला येतेय एजेंची आठवण…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजेचे लीलाबरोबरचे हे दुसरे लग्न आहे. मात्र, आजही एजे त्याच्या पहिल्या पत्नी अंतरावर प्रेम करतो. त्यामुळे त्याच्या मनात लीलाविषयी कोणत्याही भावना नाहीत. लीला व त्याच्या वयातदेखील जास्त अंतर आहे. लीला मात्र एजेच्या प्रेमात पडली आहे. तिला तीन सुना आहेत. या सुनांना लीला आवडत नाही. एजेबरोबर लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात लीला या सुनांना घाबरायची. आता मात्र ती त्यांना आदेश देत ‘सासूगिरी’ दाखवीत असल्याचे दिसत आहे. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या तीन सुना त्यांच्या सासूला म्हणजेच लीलाला घराबाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसतात. या सगळ्यात एजेची आई म्हणजेच घरातील आजी लीलावर खूप प्रेम करताना, तिला सांभाळून घेताना दिसतात.

हेही वाचा: Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

आता एजे व लीलाच्या नवीन नात्याची सुरुवात होणार का, लीला व तिच्या सुनांमध्ये गोष्टी कधी ठीक होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.