‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. लीला आणि एजेमधील होणारी छोटी-छोटी भांडणे प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळते. याबरोबरच, ज्या पद्धतीने आजी लीलाला प्रोत्साहन देतात, तिची मदत करतात, सूनांना धडा शिकवण्यासाठी लीला नवीन पद्धतीचा अवलंब करत आहे; यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होताना दिसत आहे. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

झी मराठी वाहिनीने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, लीला एजेला पाडवा असून उटणं लावण्यासाठी आग्रह करते. मात्र, एजे तिला नाही म्हणत असतो. तरीही लीला हट्ट धरते. एजे तिला म्हणतो, “तुला सांगितलं ना, मी असलं काही करणार नाही”, त्यावर लीला म्हणते, “चूपचाप पाटावर बसा, नाहीतर जो माझं ऐकतो, त्याला मी बोलवेन.” तेवढ्यात त्यांचा टायगर नावाचा कुत्रा पळत येतो आणि एजेच्या कपड्यांना धरून त्याला ओढत पाटावर घेऊन जातो. त्यानंतर लीला एजेला उटणे लावते.

tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लीलाच्या हट्टापुढे एजे झुकणार, पाडव्याचा सण साजरा होणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हे दोघे एकमेकांसाठी बनले आहेत”, “यांच्यामुळे मला खूप आनंद मिळतो”, “खूप छान प्रोमो”, “लीला मस्त, असंच करायचं”, अशा कमेंट करत या मालिकेबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.

हेही वाचा: फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लीला एजेच्या प्रेमात पडली असून तिने तिच्या भावना त्याच्याजवळ व्यक्त केल्या आहेत. मात्र, एजे अजूनही त्याच्या पहिल्या बायकोवर अंतरावर प्रेम करतो. काही दिवसांपू्र्वी गैरसमजामुळे एजेने लीलाला बाहेर काढले होते. मात्र, आजीने समजावल्यानंतर लीला पुन्हा घरी येण्याचे मान्य करते; जेव्हा ती घरी परत येते त्यावेळी ती तिच्या सुनांना कामाला लावते. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या तिच्या तिन्ही सुना लीलाचे नवे रूप पाहून आश्चर्यचकित होतात.

आता ती एजेच्या मनात घर करणार का, एजे लीलाच्या प्रेमात पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader