‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) ही मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे. या मालिकेत घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आवडत असल्याचे पाहायला मिळते. शिस्तप्रिय एजे जितका प्रेक्षकांना आवडतो तितकीच वेंधळी लीलादेखील प्रेक्षकांना आवडते. लीला अनेकदा वेंधळापणा करते. मात्र, प्रसंगी लीला धाडसाने संकटांना सामोरी जाते. आता लीला एजेच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. एजेदेखील पूर्वी दिलखुलासपणे जगायचा. पण, अंतरानंतर त्याने स्वत:वर काही बंधने लादून घेतल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी लीलाने आजीला एजेला पूर्वीसारखं जगायला शिकवेन असं वचन दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.
लीला एजेला सरप्राइज देणार, मात्र…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो नुकताच शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की लीला स्वत:बरोबर बोलताना म्हणते की लीला तू आजींना प्रॉमिस केलं आहेस.तू त्यांना त्यांचा जूना एजे परत मिळवून देशील. त्यानंतर ती विश्वरूपबरोबर फोनवर बोलताना दिसत आहे. ती त्याला म्हणते, “आता मी तुला एक काम देणार आहे.” विश्वरूप म्हणतो, “तुम्ही फक्त आदेश द्या.” त्यानंतर लीला घराबाहेर असून ती एजे ऑफिसमधून आल्यावर त्याला म्हणते, “एजे तुमच्यासाठी सरप्राइज आहे. थ्री टू वन असे लीलाने म्हणताच, विश्वरूप गाडीवरील कपडा बाजूला करतो. समोर गाडी पाहून एजेला त्याची पहिली पत्नी अंतरा आठवते. त्यानंतर तो रागाने ओरडताना दिसतो.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लीलाच्या सरप्राईजवर एजेंची अनपेक्षित प्रतिक्रिया..!”, अशी कॅप्शन दिली आहे.
नवरी मिळे हिटलरला मालिकेत दाखविल्याप्रमाणे लीला व एजे यांच्यात चांगली मैत्री आहे. लीला एजेच्या प्रेमात पडली आहे. तिने तिचे प्रेम व्यक्त केले आहे. मात्र, तिला स्पष्टपणे एजेने सांगितले की, त्याचे त्याच्या पहिल्या पत्नीवर अंतरावर प्रेम आहे. तो तिला विसरू शकत नाही.
u
दरम्यान, आता लीलाच्या प्रयत्नांना यश मिळणार का, एजे नवीन सुरूवात करणार का, दिलखुलास जगणार का, लीलाचे मनापासून केलेले प्रयत्न एजे समजून घेणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.