‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २ डिसेंबरपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ असं नव्या मालिकेचं नाव असून दुपारी २.३० वाजता प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. या मालिकेबद्दल मंगेश कदम यांच्या पत्नी अभिनेत्री लीना भागवत काय म्हणाल्या? जाणून घ्या…
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही मालिका सुरू होण्यापूर्वी दोन दमदार प्रोमो प्रदर्शित झाले. या दमदार प्रोमोमध्ये निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्याचं केमिस्ट्रीचं कौतुक लीना भागवत यांनी केलं. लीना भागवत मालिकेविषयी काय म्हणाल्या? याबाबत मंगेश कदम यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी मंगेश कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेचा प्रोमो पाहून लीना भागवत काय म्हणाल्या? असं विचारलं. तेव्हा मंगेश कदम यांनी सांगितलं की, “लीना एकदम खुश झाली. तिने निवेदिता मॅडमचं इतकं कौतुक केलं. ती म्हणाली, तुमच्यामधील केमिस्ट्री प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला या मालिकेत तरुण गेला आहात हे मला प्रोमोमधून दिसतंय. हे जास्त महत्त्वाचं असतं ना. नुसतं कास्टिंग निवेदिता सराफ, मंगेश देसाई नाही. ते नवरा बायको पण वाटले पाहिजे. इतक्या वर्षांचा प्रवास वाटला पाहिजे. त्या दृष्टीने मला लीनाची ही प्रतिक्रिया महत्त्वाची वाटते.”
हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला लाज वाटली पाहिजे”, रजत दलालची शिल्पा शिरोडकरवर टीका; म्हणाला, “तुझ्यात ताकद असेल तर…”
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेने घेतली आहे. या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या व्यतिरिक्त हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव, अदिश वैद्य, पल्लवी कदम असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.