छोट्या पडद्यावरील मालिकांच्या सेट्सवर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ‘कलर्स’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘नीरजा’ या मालिकेच्या सेटवर बिबट्या आला होता, तर आता अभिनेता शोएब इब्राहिमच्या ‘अजूनी’ मालिकेच्या सेटवर बिबट्याचा वावर पाहायला मिळाला.

हेही वाचा : “कमी पैशांत काम, गंभीर आजार, मासिक पाळीत त्रास अन्…”, बॉलीवूड अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये शोएब इब्राहिम आणि आयुषी खुराना यांच्या ‘अजूनी’ मालिकेचे शूटिंग होते. मालिकेचे शूट सुरु असताना अचानक सेटवर बिबट्या आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना घडली तेव्हा सेटवर जवळपास २०० लोक उपस्थित होते. मात्र, बिबट्याने तेथील कुत्र्यावर हल्ला केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा : “‘सुभेदार’ चित्रपटाच्या गाण्यामध्ये प्रेक्षकांना मिळणार आनंदाची बातमी”, मराठमोळ्या अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष

बिबट्या आल्याने मालिकेच्या सेटवर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात पसरलेल्या आरेच्या जंगलात आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांसह इतर वन्य प्राणी आहेत आणि त्यामुळे ते जवळपास राहणाऱ्या नागरिकांना अनेकदा दिसतात.

हेही वाचा : “मला या बाईची…”; ‘बाई पण भारी देवा’तील अभिनेत्रीने सांगितला रोहिणी हट्टंगडीबाबतचा किस्सा, म्हणाली…

दरम्यान, ‘अजूनी’ मालिकेतील मुख्य अभिनेता शोएब इब्राहिमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायाचे झाले तर, अभिनेता अलीकडेच एका गोंडस मुलाचा बाबा झाला आहे. दीपिका कक्करने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. दोघांनीही या नव्या प्रवासाची सुरुवात करताना अत्यंत आनंद होत असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader