छोट्या पडद्यावरील मलिकांमधील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या दंगल टीव्हीवरील ‘इश्क की दास्ता नागमणी’ या मालिकेतील एक सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मालिकेतील या व्हायरल व्हिडीओमध्ये कुटुंबातील सदस्य घरातील गच्चीवर पतंग उडवत आहेत. मालिकेतील हिरो आणि खलनायिकेत पतंग उडवण्याची स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे. एवढ्यात खलनायिकेने पतंगाचा मांजा खेचताच हिरो गच्चीवरुन खाली पडतो. पण खाली पडत असताना तो पतंगाच्या मांजाची दोर सोडत नाही. ते पाहून हिरोला वाचवण्यासाठी त्याची नायिकाही उडी मारते. त्यानंतर ती पतंगला पकडते. पतंगाचा आधार घेत ती हिरोचा हात पकडते. खलनायिका मांजाला ढील देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा >> ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या लग्नात जान्हवी कपूरने हाताची नस कापली अन्…; नेमकं काय घडलं होतं?
हेही वाचा >> “७५व्या वर्षी अशोक सराफ यांची ऊर्जा…”, ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
‘बेइनतहा’ या ट्विटर अकाऊंटवरुन ‘इश्क की दास्ता नागमणी’ या मालिकेतील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिकेला ट्रोल केलं आहे.
हेही वाचा >> “सहा महिन्यानंतर अजून कोणावर बलात्काराची केस…”, साजिद खानवर आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्रावर राखीची गंभीर टीका
एकाने कमेंट करत “तो पतंग पण मस्त उडत आहे. ज्या स्टीलच्या दांड्याला त्यांनी पकडलं आहे, तो तर पतंगाच्या मागच्या बाजूला पाहिजे”,असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “मांज्यावर पतंग आणि माणसे कशी काय उडत आहेत? आणि एवढा वजनदार पतंग एक व्यक्ती कसा काय उडवू शकतो?”, अशी कमेंट केली आहे.