‘शार्क टँक'(Shark Tank) हा शो उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या वस्तूंचे मार्केटिंग करतात. त्यांच्या कंपनीत ‘शार्क टँक’च्या परीक्षकांनी गुंतवणूक करावी यासाठी ते त्यांच्या कंपनी, वस्तूंबद्दल माहिती देतात. त्यांच्या उत्पादनात काय वेगळेपण आहे, कंपनीची सुरुवात कशी झाली, आतापर्यंत किती विक्री झाली, किती नफा-तोटा झाला, त्यांचे उत्पादन कोणत्या वयोगटासाठी आहे. त्यांची वस्तू जास्त काळ टिकणारी की कमी काळ टिकणारी आहे, अशा अनेक बाबींची माहिती उद्योजक सविस्तरपणे देतो. महत्त्वाची बाब म्हणजे उद्योजकांबरोबरच सामान्य प्रेक्षकही या शोचे चाहते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शार्क टँक शोमध्ये आलेल्या जोडप्याची भन्नाट लव्हस्टोरी

आता ‘शार्क टँक’मध्ये आलेल्या एका जोडीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जान्हवी, रोहन व ओजस्वी या तरुण उद्योजकांनी नुकतीच ‘शार्क टँक’मध्ये हजेरी लावली होती. त्यांनी त्यांच्या बर्गर बे या कपड्यांच्या ब्रँडबद्दल सांगितले. त्यांच्या प्रॉडक्टचे वर्णन करताना त्यांनी टेस्टी व सॉसी, असे म्हटले. ग्राहकाला प्राधान्य देण्याच्या रोहनच्या दृष्टिकोनाबद्दलही त्याने सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांना प्राधान्य देण्याने त्याच्या आयुष्यावरदेखील मोठा परिणाम झाला. त्याच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला, यासंबंधीची कहाणी रोहनने ‘शार्क टँक’च्या स्टेजवर शेअर केली.

जान्हवी ही ‘बर्गर बे’कडून घेतलेल्या कपड्यांबाबत असंतुष्ट होती. तिने याबद्दल तक्रार केली होती. तिच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी रोहनने फोन केला होता. त्याने तिला कायम मोफत खरेदी करता येईल, असे म्हणत आश्वस्त केले. अशा एकापाठोपाठ एक गोष्टी घडत गेल्या आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. काही काळानंतर रोहनने तिला कंपनीचे सह-संस्थापक बनवले. पुढे त्याने ‘शार्क टँक’च्या परीक्षकांना सांगितले की, ज्या प्रकारे नारायण मूर्ती यांनी बेंगळुरूचा कायापालट केला, तसाच बदल मला लुधियानामध्ये करायचा आहे. त्यावर अमन गुप्ताने विनोद करीत म्हटले की, त्यासाठी तुला आठवड्यात ७० तास काम करावे लागेल. त्यावर रोहनने म्हटले की, जर गरज असेल, तर मी १०० ताससुद्धा काम करायला तयार आहे.

दरम्यान, नमिता थापर व विराज यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यात रस दाखवला नाही. मात्र, कुमाल बहल, अमन गुप्ता व अनुपम मित्तल यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी प्रत्येक परीक्षकाला १०% इक्विटीच्या बदल्यात एक कोटी रुपये किंवा २०% इक्विटीच्या बदल्यात दोन कोटी रुपये, अशी ऑफर दिली. २०% इक्विटीच्या बदल्यात दोन कोटी रुपये, अशी गुंतवणूक करण्याचे त्यांनी मान्य केले. सुरुवातीला ही ऑफर स्वीकारताना रोहनने आढेवेढे घेतले; मात्र काही क्षणांतच त्याने ही ऑफर मान्य केली.