चित्रपट, मालिकांमधील प्रत्येक पात्र महत्त्वाचे असते. नायकाइतकेच महत्त्व खलनायकाच्या पात्राला असते. अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंतचे प्रत्येक पात्र जर चपखलपणे एखाद्या कलाकृतीत बसले तर ती कलाकृती उत्तमपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, त्यामुळे अनेक खलनायक-नायिका त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात. अभिनेत्री माधवी निमकर(Madhavi Nimkar) सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या शालिनीच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या निमित्ताने अभिनेत्री व्यक्त होताना दिसली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाली अभिनेत्री?

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोठारे व्हिजन व माधवी निमकरच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये सेटवरील अभिनेत्री माधवी निमकरची आवडती जागा कोणती हे तिने दाखवले असून तीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने म्हटले, “आता मी बरोबर माझ्या आवडत्या ठिकाणी उभी आहे. मी माधवी निमकर, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शालिनी आहे. आता तुम्हालाही कळलेलं आहे की मालिका संपण्याच्या मार्गावर आहे. आता वाटायला लागलं आहे की इतक्या पटापट दिवस संपायला नको. इतकी वर्षे मालिका करताना असं कधी वाटलं नाही की या भावना अशा असतात. कारण रोज शूटला येणारच आहोत असं वाटायचं. आता जिथे मी उभी आहे, ते माझं खूप हळवं ठिकाण, जागा आहे. जसा वेळ मिळेल तसं रील करायला, संध्याकाळी फोटो काढायला, मी डिस्टर्ब असेल, रडायचं असेल, खूश असेल म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भावना असतील तर मी इथे येत होते. जरी मला वाटलं की मला थोडा वेळ शांतता हवी आहे, तरीही मी इथेच यायचे. आयुष्यभर मला हे ठिकाण, हे झाड लक्षात राहील.”

पुढे चाहत्यांना उद्देशून अभिनेत्रीने म्हटले, “शालिनी तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे आजपर्यंत टिकली आहे. या चार-साडेचार वर्षांमध्ये खूप चढ-उतारही आले. ते सगळं बाजूला ठेवून काम करत राहणं आणि ते सगळं इथे येऊन शेअर करणं, मनात गप्पा मारणं किंवा बोलणं मी इथे करत होते”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ती भावूक झालेली दिसली.

हेही वाचा: “तो असता तर आयुष्य…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री वडिलांबद्दल झाली व्यक्त, म्हणाली…

दरम्यान, अभिनेत्री माधवी निमकरने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली आहे. मात्र, तिने साकारलेल्या भूमिकेचे, तिच्या अभिनयाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. सोशल मीडियावरदेखील अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. आता लवकरच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.