‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काळात एक दोन नव्हे तर पाच मालिका सुरू होणार आहेत. ‘पारु’, ‘शिवा’ या दोन नव्या मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका देखील लवकरच सुरू होणार आहेत. याच मालिकांपैकी एका मालिकेत अभिनेत्री मधुरा वेलणकरची बहीण मीरा वेलणकर झळकणार आहे.
मीरा वेलणकर ही अभिनेत्री, दिग्दर्शिका व निर्माती आहे. गेल्या वर्षी मधुराच्या बहिणीने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिने ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केलं होतं. आता मीरा नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आरोहीचा खऱ्या आयुष्यातील होणारा नवरा काय करतो काम? वाचा…
अभिनेत्री मीरा वेलणकर ‘झी मराठी’ची नवी मालिका ‘शिवा’मध्ये पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आशूची आई सीताई या भूमिकेत मीरा झळकणार आहे. १२ फेब्रुवारीपासून सोमवारी ते शनिवार रात्री ९ वाजता ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा – नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात ‘शूर्पणखा’च्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री, जाणून घ्या
दरम्यान, मीरा याआधी ‘झी मराठी’च्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत मीराने चित्रलेखाची भूमिका साकारली होती. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी मीरा आहे. त्यामुळे अभिनेत्रीला अभिनयाचं बाळकडू कुटुंबाकडून मिळालं. बालपणापासून मीरा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात मीराने काम केलं असून तिने वैविध्यपूर्ण भूमिका निभावल्या आहेत.