अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही तिच्या अभिनयासाठी सर्वपरिचित आहे. मात्र, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अभिनेत्रीला एक नवीन ओळख दिली. मधुराणी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली. अरुंधती हे पात्र तिने साकारले होते. आज अरुंधती घराघरांत पोहोचली आहे. गेली पाच वर्षे मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता स्टार प्रवाहने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मधुराणी शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याचे सांगत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

k

काय म्हणाली अभिनेत्री?

स्टार प्रवाहने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मधुराणी प्रभुलकरने म्हटले, “हॅलो, आज ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. खरंतर आम्ही सगळे खूप इमोशनल झालोय. हा दिवस कधीतरी येणार आहे हे माहीत होतं, पण तो दिवस येऊन ठेपल्यावर मनाची अवस्था फार विचित्र आहे. कारण पाच वर्ष सातत्याने रोज आम्ही हे काम करतोय. महिन्याचे वीस-बावीस दिवस कधी त्यापेक्षाही जास्त दिवस काम करतोय. हा सेट, ही मेकअप रूम आमचं घर आहे. सकाळी उठल्यावर आम्ही इथे येतो. मेकअपला बसतो आणि जसा जसा मेकअप चेहऱ्यावर चढतो, जसे केस तयार होतात, तसतशी अरूंधती आरशात सापडायला लागते आणि मधुराणीची नकळत अरुंधती व्हायला लागते. हा गेल्या पाच वर्षांचा प्रवास आहे. यात सगळ्यात मोठा वाटा मेकअप आर्टिस्टचा आहे. मला असं वाटतं की, कलाकाराला कॅरॅक्टर सापडताना तयार होण्याची जी प्रोसेस असते, त्यात त्यांचा खूप मोठा वाटा असतो.”

इन्स्टाग्राम

“शेवटची भेटतेय मी अरूंधतीला, शेवटची तयार होतेय. हा खूप भावनिक क्षण आहे. या मेकअप रूमच्या भिंतींनी पाच वर्ष काय काय ऐकलंय, काय पाहिलंय काय माहीत. मी व अपूर्वा ही रूम शेअर करतो. इतक्या गोष्टी शेअर केल्या आहेत. आनंदाचे क्षण, भावूक क्षण, काही हळवे क्षण या सगळ्याला या भिंती पाच वर्षे साक्ष आहेत. आमच्यात होत जाणाऱ्या बदलांच्या, वाढीच्या साक्ष आहेत. या भिंतींनी, या आरशाने सांभाळून घेतलं आहे”, अशा शब्दांत मधुराणीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे बोलताना मधुराणी भावुक झाल्याचे पाहायला मिळाली.

हेही वाचा: Video: ‘पारू’ फेम अभिनेत्रीने मासे पकडण्यासाठी गळ टाकला अन्…; व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, मधुराणी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या कवितांसाठीदेखील ओळखली जाते. ती सादर करत असलेल्या कवितांना चाहत्यांची विशेष पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते.