गेल्या चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. २०१९ पासून सुरू झालेल्या या मालिकेवर अजूनही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या मालिकेत अरुंधतीचा नवा प्रवास सुरू झाला आहे. १८ मार्चपासून ‘आई कुठे काय करते’ ही मालिका दुपारी २.३० वाजता प्रसारित होतं आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेतील मोठ्या ट्विस्टचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं निधन झाल्याचं दाखवलं होतं. हा प्रोमो नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केला होता. पण ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अशाप्रकारचे ट्विस्ट पाहून अरुंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकराच्या आईची रिअॅक्शन काय असते? जाणून घ्या…
हेही वाचा – Video: निवृत्त सैनिकाने उभारली कोट्यवधींची कंपनी, काम पाहून शार्क्सनी केलं सॅल्यूट, दिली ‘ही’ ऑफर
मालिकेतील नव्या प्रवासानिमित्ताने नुकताच मधुराणी प्रभुलकरने ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी मुधराणीला विचारण्यात आलं की, ‘आई कुठे काय करते मालिके’विषयी घरच्यांची काय प्रतिक्रिया असते? तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “माझ्या घरी माझी मालिका पाहत नाही. कारण माझी मुलगी लहान आहे. त्यामुळे आमच्या घरात टीव्ही तेवढा लावला जात नाही. माझी मुलगी तिच्या वयानुसार कंटेंट बघते. त्याच्यामुळे आमच्या घरात प्रत्यक्षात मालिका पाहत नाही. पण माझी आई मधेमधे बघत असते. तिचं काहींना काहीतरी प्रत्येक गोष्टीवर म्हण असतं. आता काय हे नवीन? असं का दाखवताय? तुला किती संकटातून पाठवणार आहेत? कशाला एवढं? तू किती रडणार आहेस? असं तिला होतं असतं. पण तिला समजून सांगते.”
हेही वाचा – किरण रावच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने भारावली मराठी अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली, “अजून काय हवं…”
दरम्यान, मधुराणीची आई देखील एक कलाकार आहे. विजया गोखले असं त्यांचं नाव असून त्या शास्त्रीय गायिका आहेत. त्यांनी शास्त्रीय गाण्याच्या अनेक मैफिली रंगवल्या आहेत. त्यामुळे मधुराणी व तिची बहीण अमृता यांना देखील गायनाची आवड आहे.