‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. या मालिकेत ‘अरुंधती’ या मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही ना काही विशेष कारणांनी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका खास मैत्रिणीसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मधुराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एका व्हिडीओ चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मधुराणीबरोबर गायिका स्वरांगी मराठेही दिसत आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि आपल्या कामाच्या अपडेट्ससह त्या त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील काही क्षणही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मधुराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर आता गायिका स्वरांगी मराठेबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
आणखी वाचा- “मुंबईत रस्ता क्रॉस करताना…” आयुष्यातल्या ‘त्या’ खास व्यक्तीसाठी मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट
मधुराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणी आणि स्वरांगी ‘का रे दुरावा’ हे गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना मधुराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “का रे दुरावा….का रे अबोला. ह्या कसलेल्या गुणी गायिकेबरोबर गायला धाडस लागतं. ते केलंय मी..!” या व्हिडीओमध्ये मधुराणी सुमधुर आवाजात हे गाणं गात असल्याचं दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओचं खूप कौतुक होताना दिसत आहे.
आणखी वाचा- मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्या युजरला ‘अरुंधती’चं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मराठी परंपरेचा पुळका…”
दरम्यान नुकताच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील एक एपिसोड गायिका स्वरांगी मराठेबरोबर शूट करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये स्वरांगी आणि मधुराणी प्रभुलकर यांची सुरेल जुगलबंदी दाखवण्यात आली होती. मधुराणी प्रभुलकर एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच सुरेल गायिकाही आहेत. हे त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओवरून स्पष्ट होतं. या व्हिडीओवर स्वरांगीनेही कमेंट करत मधुराणी यांचं कौतुक केलं आहे.