माधुरी दीक्षित येत्या १५ मे रोजी तिचा ५७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. ‘तेजाब’, ‘खलनायक’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम करून धकधक गर्लने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिचं हास्य, तिचं नृत्य पाहून प्रेक्षक भारावून जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधुरी दीक्षित दमदार अभिनेत्री असण्याबरोबरच ती उत्तम नृत्यांगणा सुद्धा आहे. ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये तिने जबरदस्त डान्स करत नृत्य दिग्दर्शकापासून ते रसिक प्रेक्षकांपर्यंत प्रत्येकाकडून कौतुकाची थाप मिळवली. अशी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सध्या ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक विविध थीमवर आधारित परफॉर्मन्स सादर करतात. हा आठवडा खास माधुरीचा ‘बर्थडे स्पेशल वीक’ म्हणून साजरा करण्यात आला.

हेही वाचा : चार वर्षांनी भारतात परतलेली मृणाल दुसानिस सध्या काय करते? म्हणाली, “ठाण्याला शिफ्ट होऊन…”

‘डान्स दीवाना’चे स्पर्धक आणि काही कलाकारांनी माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत अभिनेत्रीला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरली म्हणजे अभिनेत्रीचे पती डॉ. श्रीराम नेने या भागाचे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. भर कार्यक्रमात अचानक एन्ट्री घेत त्यांनी बायकोला गोड सरप्राइज दिलं.

शो सुरू झाल्यावर माधुरी आणि डॉ. नेने दीपानिता या चिमुकलीचा परफॉर्मन्स पाहून भारावून गेले. “मी याआधी असं टॅलेंट कोणातंही पाहिलेलं नाही याला अपवाद माधुरी आहे कारण, ती सुद्धा अशीच हुशार होती. तू खरंच सुंदर डान्स करतेस” अशी प्रतिक्रिया डॉ. नेनेंनी दीपानिताला दिली.

हेही वाचा : Video : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या मंचावर ‘नाच गं घुमा’! भरत जाधव, अलका कुबल यांचा जबरदस्त डान्स

शोमधील या स्पर्धक तरुणीचं डॉ. नेनेंनी कौतुक केल्यावर माधुरी आणि दीपानिताने लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स केला. या दोघींना एकत्र डान्स करताना पाहून सगळेच आनंदी झाले होते. डॉ. नेनेंनी तर आनंदाच्या भरात आपल्या बायकोसाठी शिट्ट्या सुद्धा मारल्या.

हेही वाचा : “सर्वात चांगली आई…”, मातृदिनानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला खास व्हिडीओ; जिनिलीया कमेंट करत म्हणाली…

सध्या माधुरीच्या या डान्सचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. नेटकरी धकधक गर्लवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ‘कलर्स वाहिनी’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पेजवरून या डान्सची खास झलक शेअर करण्यात आली आहे.