अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्ष ती तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. तर आता लवकरच ती झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावताना दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या झी मराठीच्या मालिका विश्वातील पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. या पुरस्कार सोहळ्याला माधुरी दीक्षितही उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम सोहळ्यात माधुरी नायिकांना संसारातील काही टिप्स देताना दिसणार आहे. त्या दरम्यानचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : ‘असा’ झाला होता माधुरी दीक्षितचा लग्न सोहळा, अनेक वर्षांनी खुलासा आली म्हणाली, “अमेरिकेत भावाच्या घरी…”

झी मराठीवरील मालिकेतील अनेक नायिकांना त्यांच्या सासूकडून होणारा छळ सहन करावा लागतो. तर या पुरस्कार सोहळ्यात हा छळ सहन न करता आपल्या सासूला कसं सामोरं जायचं याचे धडे माधुरी नायिकांना देणार आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील आनंदी माधुरी दीक्षितला विचारताना दिसते की, “माझी सासू तशी चांगली आहे पण त्यांना सतत चहा लागतो. किती काम करणार मी! तर काय करायला हवं यासाठी?” त्यावर माधुरी म्हणते, “मी दोन-तीन गोष्टी सांगते. दरवेळी चहामध्ये साखरच घालायला हवी असं काही नाही. कधीतरी मीठ पडलं तरी चालेल. किंवा त्यांना विचारा हम आपके है कोन? सून की मोलकरीण?”

हेही वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

आता माधुरीचा हा मजेशीर व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षक आणखीनच उत्सुकता व्यक्त करत आहेत. ४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा पाहता येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit gives advice to actresses of zee marathi about how to answer mother in law rnv