माधुरी दीक्षित म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक. गेली अनेक दशकं ती तिच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या कामाबरोबरच ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. करिअरच्या शिखरावर असताना तिने श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. त्यांचा हा लग्न सोहळा कसा पार पडला होता हे तिने आता सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९९ साली माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अनेक वर्ष माधुरी मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेऊन अमेरिकेत तिच्या संसारात रमली होती. त्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे. तेव्हा श्रीराम नेने अमेरिकेत राहायचे. त्यामुळे माधुरी आणि श्रीराम नेने यांचा लग्न सोहळा अमेरिकेत पार पडला. तर आता तिने तिच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आणखी वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

माधुरी लवकरच ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात हजेरी लावताना दिसणार आहे. यावेळी ती तिचं लग्न कसं संपन्न झालं याबद्दलही बोलताना दिसेल. या दरम्यानची एक छोटीशी व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यात माधुरी म्हणते, “माझं लग्न अमेरिकेत झालं. माझ्या भावाच्या घरीच आम्ही आमचे कुटुंबीय आणि जवळचे काही मित्रमंडळी असं मिळून छोटसं आणि साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं.”

हेही वाचा : माधुरी दीक्षितने परिधान केलेल्या चिकनकारी कुर्तीची किंमत फक्त…; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक

माधुरी आणि श्रीराम यांना दोन मुलं आहेत. त्यांची नावं रायन आणि अरीन अशी आहेत. गेली अनेक वर्षं माधुरी अमेरिकेत राहत होती. तर काही वर्षांपूर्वीच ती कुटुंबासह भारतात स्थायिक झाली. तर आता पुन्हा एकदा माधुरी विविध चित्रपटांमधून आणि रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit reveals how was her wedding ceremony happened in america rnv