अश्नीर ग्रोव्हर ‘शार्क टँक’च्या पहिल्या पर्वानंतर खूप लोकप्रिय झाला. त्याच्या अनेक मुलाखती, त्याची वक्तव्यम व त्याचं वैयक्तिक आयुष्य चाहत्यांमध्ये चांगलंच चर्चेत असतं. अश्नीर आणि त्याची पत्नी माधुरीने नुकतीच एक मुलाखत दिली, यात त्यांनी त्यांची प्रेमकहाणी, वैयक्तिक आयुष्य, करिअरची सुरुवात व संघर्षाबद्दल भाष्य केलं. सुरुवातीला दोघेही एका खोलीच्या घरात राहत होते, त्या वेळी ते बऱ्याचदा बाथरूममध्ये एकत्र आंघोळ करायचे, याचा त्यांनी रंजक पद्धतीने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मराठी चित्रपट ‘TDM’ला शो मिळेना, कलाकारांना थिएटरमध्ये कोसळलं रडू; दिग्दर्शक म्हणाले, “असा भेदभाव…”

अश्नीर व माधुरी यांनी नुकतीच आरजे अनमोल व अमृता राव यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. अश्नीर ग्रोवर आणि माधुरी जैन यांनी सांगितलं की, लग्नानंतर ते मुंबईत 1BHK फ्लॅटमध्ये राहत होते. या दाम्पत्याने त्या इमारतीला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. माधुरीने सांगितलं की, ते ज्या परिसरात राहायचे, तिथे आता अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. परिसर पूर्वीसारखा राहिलेला नाही. १६ वर्षांपूर्वी ते दोघेही कामासाठी दिल्लीहून मुंबईला आले होते.

हेही वाचा – ३२ हजार महिलांचं धर्मांतर केल्याचा दावा, ‘द केरळ स्टोरी’बद्दल शशी थरूर यांचं खुलं आव्हान; म्हणाले, “४ मेपर्यंत पुरावे द्या अन्…”

माधुरी म्हणाली, “आमच्या घरी साधं टेबलही नव्हतं. आम्ही खाली बसून जेवायचो. आमच्या एका महिन्याच्या पगारातून आम्ही फर्निचर विकत घेतलं होतं. एकदा अश्नीरने लकी ड्रॉद्वारे १२ लाखांची बाइक जिंकली होती. मी त्याला विचारलं की, बक्षिसामध्ये अजून काय आहे, तर त्याने सांगितलं की, एलसीडी टीव्हीपण आहे. मग मी अश्नीरला टीव्ही आणायला सांगितलं. कारण मी त्याला बाइक चालवू द्यायची नाही. आम्ही मुंबईत ४८ हजार पगारावर जगत होतो.”

पुढे माधुरी म्हणाली, “आम्ही १६ हजार रुपये भाडं द्यायचो आणि बाकीच्या पगारात सिनेमा पाहायला जायचो. प्रीमियम सीट्स घेण्यासाठी आणि चांगल्या जेवणावर पैसे खर्च करायचो. इतकंच नाही तर, आम्ही अमेरिका आणि कॅनडालाही जायचो, कारण तेव्हा डॉलर ४० रुपयांवर होता. आमच्या घरात एकच बाथरूम होतं. कधीकधी आम्ही दोघे एकत्र आंघोळ करायचो. कारण एकच बाथरूम असल्याने ऑफिसला जायला उशीर व्हायचा.”

माधुरीने सांगितलं की, जेव्हा अश्नीर मुंबईत होता, तेव्हा तो खूप रोमँटिक होता. आम्ही फक्त अॅनिव्हर्सरी व वाढदिवशीच एकमेकांना गिफ्ट द्यायचो असं नाही, तर आम्ही नेहमी एकत्र शॉपिंग करायचो, एकमेकांना आवडणाऱ्या त्या गोष्टी घेऊन द्यायचो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri jain ashneer grover used to take bath together while living in mumbai hrc