टीव्ही अभिनेता अरुण सिंह राणा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. अरुण सिंहचा घटस्फोट झाला आहे. लग्न मोडल्यानंतर त्याने किती कठीण प्रसंगांचा सामना केला, याबाबत सांगितलं. एवढेच नाही तर, त्याने स्वतःची तुलना पत्नीच्या जाचामुळे आत्महत्या करणाऱ्या अतुल सुभाषशी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नैराश्यात होता अरुण सिंह राणा

ई-टाइम्सशी बोलताना अरुण सिंह राणा म्हणाला, “मी गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये घटस्फोट घेतला आहे. लग्न वाईट होतं, त्यामुळे मी खूप संघर्ष करत होतो आणि इतर कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो, पण देवाच्या कृपेने आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मी खंबीर राहिलो. अतुल सुभाषला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल हे मी सहज समजू शकतो.”

हेही वाचा – “मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन

अरुण पुढे म्हणाला, “त्या परिस्थितीला तोंड देताना अनेक वेळा असं होतं की तुम्ही त्या टप्प्यावर पोहोचता जेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य संपवण्यास तयार असता. मग तुम्हाला कोणतीही आशा दिसत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की, कधीही हार मानू नये, कारण अंधाऱ्या रात्रीनंतर नेहमी सकाळ होतेच. आयुष्य ही देवाने दिलेली देणगी आहे, त्याचा आदर केला पाहिजे. प्रेम केलं पाहिजे आणि चांगले कर्म करून जगलं पाहिजे. मी बरा होत आहे, माझे कुटुंब मला यासाठी मदत करत आहे. मला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या बहिणीचा आणि आई-वडिलांचा आभारी आहे.”

हेही वाचा – ३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral

अरुणने करिअरबद्दल केलं वक्तव्य

अरुण सिंह राणा म्हणाला, “मला २०२५ मध्ये करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे मी माझ्या आयुष्यातील चार वर्षे गमावली आहेत. मला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे आणि ते पुन्हा मिळावे यासाठी मी उत्सुक आहेत. आता मी काही चांगल्या भूमिका करण्यासाठी उत्सुक आहे.”

हेही वाचा – सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…

अरुण सिंह राणाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने २०१३ मध्ये ‘महाभारत’ मधून करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्याने ‘दीया और बाती हम’ व ‘नागिन 6’ सह काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabharat fame actor arun singh rana divorce compares himself with atul subhash situation hrc