९० च्या दशकात नितीश भारद्वाज यांनी ‘महाभारत’ मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. आता बऱ्याच वर्षांनंतर नितीश त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. नितीश भारद्वाज यांनी २००९ मध्ये आयएएस अधिकारी स्मिता गाटेशी लग्न केलं होतं. त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार आले आणि २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता घटस्फोटानंतर काही वर्षांनी नितीश भारद्वाज यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्मिताविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्मिता मानसिक छळ करत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे.

अभिनेत्याने शेती करण्यासाठी सोडला अभिनय, मोठं नुकसान झालं अन् आता कर्ज फेडण्यासाठी…; म्हणाला, “पाच वर्षे…”

नितीश भारद्वाज यांनी दिली तक्रार

नितीश भारद्वाज यांनी भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांना मेल लिहून त्यांच्याकडे मदत मागितली आहे. त्यांनी मेलमध्ये लिहिलंय स्मिता त्यांना त्यांच्या दोन्ही मुलींना भेटू देत नाही आणि त्यांचा मानसिक छळ करत आहे. नितीश यांच्या तक्रारीनंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी अतिरिक्त डीसीपी शालिनी दीक्षित यांच्याकडे देण्यात आली आहे. तक्रार मिळाल्याची पुष्टी करताना पोलिस आयुक्तांनी सांगितलं की नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी यांच्यात कौटुंबिक न्यायालयात खटला प्रलंबित आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने एअरलाइन कॅप्टनशी केलं लग्न, राजस्थानमध्ये मराठी लूकने वेधलं लक्ष, पाहा Photos

नितीश-स्मिताचं होतं दुसरं लग्न

नितीश भारद्वाज आणि आयएएस स्मिता गाटे यांची भेट त्यांच्या एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. दोघांनी २-४ वेळा भेटल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १४ मार्च २००९ रोजी लग्नगाठ बांधली. नितीश भारद्वाज आणि स्मिता गाटे यांचे हे दुसरे लग्न होते. दोघांचाही पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाला होता. नितीश यांचे पहिले लग्न मोनिषा पाटीलशी झालं होतं. २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

नितीश व स्मिता यांच्या लग्नानंतर काही वर्षे सर्व काही सुरळीत चाललं, पण २०१९ मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात त्यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली आणि २०२२ मध्ये अधिकृतरित्या त्यांचे नाते संपुष्टात आले. आयएएस अधिकारी स्मिता गाटे सध्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabharat fame nitish bharadwaj mental torture allegations on ex wife ias officer smita gate hrc