ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट चार दिवसांपूर्वी म्हणजेच २१ जुलै २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट अणुबॉम्बचे जनक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेता किलियन मर्फीने ओपेनहायमर यांची भूमिका साकारली आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून भारतात वादात अडकला आहे.

रॉबर्ट ओपेनहायमर यांना भगवद्गीतेची प्रचंड ओढ होती. १९३० च्या दशकात त्यांचा प्राचीन हिंदू धर्मग्रंथांशी परिचय झाला आणि त्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. भाषांतर न करता भगवद्गीता वाचायची असं त्यांनी ठरवलं होतं, त्यामुळे ते वाचण्यासाठी ते संस्कृतही शिकले होते, असा उल्लेख चित्रपटात आहे. पण चित्रपटात अभिनेता किलियन मर्फी म्हणजेच ओपनहायमर सेक्स सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आला आहे. त्यामुळे याला विरोध होत आहे. यावर महाभारत मालिकेतील श्रीकृष्ण म्हणजेच नितीश भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Yoga Centre Descent Into Sex Cult Woman Told The Story
Sex Racket : १००० कुमारिकांशी शय्यासोबत करण्याची भोंदू योग गुरूची मनिषा; सेक्स रॅकेट उघड
Loksatta readers reactions on lokrang article
पडसाद : दबंग, पण सहृदयी अधिकारी
Mamta Kulkarni reacts on doing movies after taking sanyas
ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी का निवडला किन्नर आखाडा? सिनेविश्वात परतणार का? उत्तर देत म्हणाली…
Hemangi Sakahi And Mamta Kulkarni
ममता कुलकर्णीच्या किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदावरून वाद; किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांचे संतप्त सवाल
Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”
people born on these dates are Best Wife
‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात परफेक्ट लाइफ पार्टनर! सुख दु:खात नवऱ्याला देतात साथ, करतात आर्थिक सहकार्य

‘ओपनहायमर’मधील सेक्स करताना भगवद्गीता वाचण्याचा सीन हटवणार; मंत्री अनुराग ठाकूर यांनी सेन्सॉर बोर्डला खडसावले

‘ई-टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, नितीश भारद्वाज म्हणाले, “भगवद्गीता युद्धाच्या मैदानात कर्तव्याची भावना शिकवते. आपल्या जीवनातील संघर्ष देखील प्रामुख्याने भावनिक रणांगण आहेत. श्लोक ११.३२ मध्ये अर्जुनाला एक योद्धा म्हणून त्याचे कर्तव्य बजावण्यास सांगितलं होतं, जे दृष्टाशी लढणं आहे. प्रत्येकाने श्लोक समजून घेणं आवश्यक आहे. कारण मी अनंतकाळ आहे, जो प्रत्येकाला मारून टाकेन, त्यामुळे तुम्ही मारलं नाही तरी प्रत्येक जण मरणारच. म्हणून तुमचं कर्तव्य पूर्ण करा.”

…म्हणून हॉलीवूड अभिनेत्याने वाचली भगवद्गीता, कोण होते ओपेनहायमर? त्यांचं भगवद्गीता अन् संस्कृतशी कनेक्शन काय?

पुढे ते म्हणाले, “जेव्हा ओपनहायमरने अणुबॉम्ब तयार केला आणि जपानच्या बहुतांश लोकसंख्येला मारण्यासाठी त्याचा वापर केला, तेव्हा तो स्वत: प्रश्न विचारत होता की त्याने आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले आहे का? त्याच्या प्रसिद्ध मुलाखतीत तो रडताना दाखवला गेला होता, याचा अर्थ त्याला कदाचित त्याच्या शोधाबद्दल पश्चात्ताप झाला असावा. त्याने कदाचित पाहिलं होतं की त्याच्या शोधामुळे भविष्यात मानवजातीचा नाश होईल. त्यामुळे ओपनहायमरची ही भावनिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. एक शास्त्रज्ञ त्याच्या निर्मितीबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो. त्याच्या मनात निर्मितीबद्दलच विचार असतात. त्यामुळे कोणतीही फिजिकल क्रिया ही केवळ एक नैसर्गिक यांत्रिक क्रिया असते.”

सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन; ‘ओपनहायमर’मधील त्या सीनवर भडकले नेटकरी; म्हणाले “लाज वाटली…”

नितीश यांनी प्रेक्षकांना नोलनच्या संदेशाचा अचूक अर्थ लावण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले, “मी लोकांना आवाहन करतो की, ओपेनहायमरच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांच्या या भावनिक पैलूचा विचार करा, समजून घ्या. आजची परिस्थिती कुरुक्षेत्रासारखीच आहे, म्हणूनच ब्राह्मण आणि क्षत्रियांनी जाणीवपूर्वक युद्धाचा वेद – धनुर्वेदाचा प्रचार केला नाही. संयुक्त राष्ट्रांनी आण्विक नि:शस्त्रीकरणाची गांभीर्याने अंमलबजावणी केली पाहिजे. नोलनचा संदेश थेट आणि स्पष्ट आहे.”

Story img Loader