फिल्मस्टार्सची फसवणूक झाल्याची प्रकरणे आपल्यासमोर आहेत. अभिनेते अन्नू कपूर यांना गंडा घालणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्याची बातमी समोर आली होती. अशीच एक घटना ‘महाभारत’ फेम अभिनेता पुनीत इस्सरबरोबर घडली आहे. ज्येष्ठ अभिनेते पुनीत इस्सर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. आरोपींनी पुनीत इस्सर यांचे खाते हॅक करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटकदेखील केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रीपोर्टनुसार माहितीनुसार, दक्षिण मुंबई परिसरात पुनीत यांचा शो आयोजित करण्यात आला होता, आरोपीने आधी त्यांचा ईमेल आयडी हॅक केला. नंतर त्यांनी शोच्या बुकिंगमधून मिळालेले १३.७६ लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पुनीत यांनी काही कामासाठी त्यांचा ईमेल पाहिला तेव्हा ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पुनीत इस्सर यांनी तत्काळ ओशिवरा पोलिस चौकीत तक्रार नोंदवली.

आणखी वाचा : जितेंद्र जोशीची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट; म्हणाला, “काका तू कायम राहणार आहेस…”

या प्रकरणावर तपास करणारे पोलीस अधिकारी म्हणाले की, “तपासादरम्यान, आम्ही इस्सर यांचा शो ‘जय श्री राम-रामायण’ रद्द करण्याबद्दल एनसीपीएकडे चौकशी केली आणि बँक खात्यात १३.७६ लाख रुपये ट्रान्सफर केल्याचा तपशील मिळाला. या माहितीच्या आधारे आम्ही उत्तर मुंबईतील मालवणी परिसरातून आरोपीला पकडले.” कायद्याच्या तरतुदीनुसार त्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

पुनीत इस्सर यांनी महाभारतात दुर्योधनाची भूमिका साकारली होती. ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर या अभिनेत्याला घराघरात ओळख मिळाली. पुनीत यांनी अनेक चित्रपटांतूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. याशिवाय त्यांनी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. नुकतंच पुनीत यांनी ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटातही काम केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabharat tv serial actor puneet issar email hacked and cheated for 13 lakh avn