‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारे दादूस म्हणजेच अरुण कदम काही दिवसांपूर्वी आजोबा झाले आहेत. अरुण कदम यांच्या लेकीला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. नुकतंच त्यांचे जावई सागर पोवाळेने एक पोस्ट शेअर केली आहे.
अरुण कदम यांची लेक सुकन्याने १९ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. त्याच्या जन्मानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले होते. यातील काही फोटोत अरुण कदम, त्यांची बायको आणि लेकीच्या सासरचे कुटुंब दिसत आहे.
आणखी वाचा : पाऊस, पारंपारिक लूक अन्…; अरुण कदम यांच्या लेकीचं मॅटर्निटी फोटोशूट, साधेपणाने वेधलं लक्ष
त्यानंतर आता सागरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. यामुळे आमचे कुटुंब हे या दोन पावलांनी वाढले आहे. आम्हाला आणि आमच्या बाळाला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे”, असे कॅप्शन सागरने दिले आहे.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
दरम्यान अरुण कदम यांची लेक कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे. तिचे आणि सागरचे लग्न २०२१ मध्ये झाले. त्यानंतर आता २०२३ मध्ये त्यांनी पहिल्या बाळाचे स्वागत केले.